घरदेश-विदेश'माझ्या आयुष्यात मला बर्‍याचदा मारहाण झाली, आधी CPM आणि आता BJP कडून...

‘माझ्या आयुष्यात मला बर्‍याचदा मारहाण झाली, आधी CPM आणि आता BJP कडून सुरुये’

Subscribe

पश्चिम बंगालच्या झारग्राम प्रचारासाठी गेलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धक्कादायक खुलासा

पश्चिम बंगालच्या झारग्राम प्रचारासाठी गेलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धक्कादायक खुलासा केल्याचे समोर आले आहे. या केलेल्या खुलास्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधान आले आहे. झारग्राम येथील जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी असे सांगितले की, राजकीय कारकीर्दीत मला बर्‍याचदा मारहाण करण्यात आली आहे. पूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लोक मारहाण करायचे आणि आता भारतीय जनता पक्षाचे नेतेही असेच करत आहेत. मात्र, आता सीपीएममधील लोकच भाजपमध्ये गेले आहेत. यावेळी ‘जय श्री राम’ च्या घोषणा करत ममतांनी भाजपवर हल्लाबोलही केला. नंदीग्राम येथील झालेल्या पायाच्या दुखापतीनंतर ममता व्हीलचेअरवर प्रचार करत असल्याची माहिती मिळतेय.

बुधवारी १० मार्च रोजी नंदीग्राम येथे जखमी झाल्यानंतर ममता बॅनर्जींनी या हल्ल्यास कोणाचा तरी कट असल्याचे म्हटलंय. तर टीएमसीचे म्हणणे आहे की, भाजपा नेत्यांनी जाणीवपूर्वक ममतांवर हल्ला केला. मात्र, विविध अहवालाच्या आधारे निवडणूक आयोगाने हा हल्ला केवळ अपघात असल्याचे वर्णन करत हा हल्ला फेटाळून लावल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

बंगाल निवडणुकीच्या वेळी मी घरी बसून राहावे, मला कोणताही प्रचार करता येऊ नये, असा भाजपचा डाव होता, त्यामुळे त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला. भाजपचे लोक माझा आवाज दाबू शकत नाहीत. या निवडणुकीत आम्ही भाजपला चांगलेच पराभूत करू, असे ममता बॅनर्जी यांनी प्रचारसभेत उपस्थित जमलेल्या मतदारांना सांगितले. यासह ते असेही म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने झारग्राम मतदारसंघातून विजय मिळविला होता, परंतु भाजपाच्या खासदारांनी झारग्राम मतदारसंघात लोकांच्या कोणत्याही मागण्या किंवा प्रश्न सोडवले नाही.

दुखापतींनी भरलेलं ममता बनर्जींचं आयुष्य

मिळालेल्या माहितीनुसार, १९९० मध्ये सीपीएमच्या एका तरुण नेत्याने ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यांमुळे त्यांच्यावर संपूर्ण महिनाभर उपचार सुरू होते. या घटनेनंतरही ममता बॅनर्जी खंबीप नेत्या म्हणून पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्यात. तर जुलै १९९३ मध्ये बॅनर्जी युवा कॉंग्रेसचे नेते असताना फोटो मतदार ओळखपत्राच्या मागणीसाठी तत्कालीन सचिवालय लेखकांच्या इमारतीकडे मोर्चा काढत असताना पोलिसांनी त्यांना मारहाण केली होती. या मोर्च्यात सहभागी आंदोलकांची पोलिसांशी बाचाबाची झाली. या पोलिसांच्या बाचाबाचीत झालेल्या गोळीबारात युवा कॉंग्रेसचा १४ वर्षीय कार्यकर्ता ठार झाला आणि पोलिसांनी मारहाण केल्यानंतर बॅनर्जी यांना अनेक दिवस रूग्णालयात घालवावे लागल्याची माहिती मिळतेय.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -