घरमनोरंजनDadasaheb Phalke Award: सुपरस्टार रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार, आज...

Dadasaheb Phalke Award: सुपरस्टार रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार, आज होणार पुरस्काराने सन्मानित

Subscribe

सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांना आज (२५ ऑक्टोबर) ‘५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. चाहत्यांकडूनही रजनीकांत यांचे अभिनंदन केले जात आहे. अनेक चाहते सोशल मीडियावर अभिनंदन करणाऱ्या आणि अभिनेत्याबद्दल आपले प्रेम व्यक्त करणाऱ्या पोस्ट करत आहे. ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’साठी रजनीकांत यांच्या नावाची घोषणा एप्रिल महिन्यातच केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार प्रकाश जावडेकर यांनी केली होती.

- Advertisement -

यानंतर डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल इंडियाने ट्वीट करत माहिती शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिले की, चाहत्यांमध्ये थलायवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या रजनीकांत यांना ‘५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार’ २५ ऑक्टोबर रोजी देण्यात येत आहे. यासाठी रजनीकांत आज दिल्लीतील पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणार आहेत. रजनीकांत यांनी सांगितले की, सोमवार माझ्यासाठी एक खास क्षण असेल कारण यावेळी त्यांना देशातील प्रतिष्ठीत सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. मला चाहत्यांकडून मिळणारे प्रेम आणि पाठींब्यामुळे भारत सरकारचा दादा साहेब पुरस्कार प्रदान केला जात आहे.

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत आपला दबदबा निर्माण करणारे रजनीकांत भारतातील सर्वात लोकप्रिय स्टारपैकी एक आहेत. यापूर्वी भारत सरकारने २००० मध्ये पद्मभूषण आणि २०१६ मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांना सन्मानित केले होते. रजनीकांत यांनी ‘अपूर्वा रागंगाल’ या चित्रपटातून तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर त्यांनी बाशा, शिवाजी, एंथिरन सारख्या अनेक सुपरहिट सिनेमांतून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यामुळे चाहत्यांकडूनही दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी रजनीकांत यांचे नाव ऐकून आनंद व्यक्त होत आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -