घरमनोरंजनदगडू-प्राजू रिटर्न? रवी जाधवच्या इन्स्टा पोस्टमुळे चर्चेला उधाण

दगडू-प्राजू रिटर्न? रवी जाधवच्या इन्स्टा पोस्टमुळे चर्चेला उधाण

Subscribe

'बदाम तिर्री'च्या फोटोसह त्याने ''काय असेल हे? Any guesses?' असे कॅप्शन देत आपल्या चाहत्यांना प्रश्न विचारला आहे.

सध्या सगळेच अभिनेते कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांना नवनवीन प्रोजेक्टबद्दल माहिती देत असतात. यापैकीच सोशल मीडियावर सर्वाधिक अॅक्टीव असणारा दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव. त्याचे चालू असणारे आणि आगामी प्रोजेक्ट्स बद्दल तसेच, आपले फोटो आणि वैयक्तिक मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतो.

 

View this post on Instagram

 

काय असेल हे? Any guesses?

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

- Advertisement -

पोस्टमुळे चर्चेस उधाण

रवी जाधवने आपल्या सोशल मीडियातील इंस्टाग्रामवर नुकताच ‘बदाम तिर्री’च्या पानाचा फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे. या फोटोसह त्याने ”काय असेल हे? Any guesses?’ असे कॅप्शन देत आपल्या चाहत्यांना प्रश्न विचारला आहे. या फोटोवर अनेक रवी जाधवच्या चाहत्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. या प्रतिक्रीयांवरून ‘टाईमपास ३’ येणार असल्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे.

चाहत्यांमध्ये उत्सुकता

या इंस्टाग्रामवरील ‘बदाम तिर्री’ च्या फोटोमुळे ‘टाईमपास ३’ येणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ‘टाईमपास’ मधील प्राजक्ता आणि दगडूने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसह प्रेक्षकांनी ‘टाईमपास २’ वर देखील तेवढेच प्रेम केले. ‘टाईमपास’ मधील केतकी माटेगांवकर, प्रथमेश परब तसेच, ‘टाईमपास २’ मध्ये प्रिया बापटसोबत प्रियदर्शन जाधवने देखील उत्तम अभिनय केला होता. मात्र आता ‘टाईमपास ३’ खरच आला तर त्याची कथा नेमकी कशी असेल आणि मुख्य भूमिकेत कोण दिसेल याकरिता रवी जाधवच्या सोशल मीडियाच्या पोस्टची वाट मात्र त्याच्या चाहत्यांना पाहावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -