घरमहाराष्ट्रशेवडी पोलिसांनी पकडली १२ लाख रुपयांची संशयित रक्कम

शेवडी पोलिसांनी पकडली १२ लाख रुपयांची संशयित रक्कम

Subscribe

गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना एका वाहनात १२ लाख रुपयांची रोख रक्कम मिळाली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास शिवडी पोलीस करत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात पोलिसांकडून कडक तपासणी सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतासाठी पैसे वाटप केले जातात. त्यामुळे निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून देशभरातील नाक्यानाक्यावर वाहनांची तपासणी केली जाते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील बऱ्याच ठिकाणी पैसे आढळ्याची बाब समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एका वाहनात लाखो रुपये आढळले होते. असाच काहीसा प्रकार मुंबईच्या शिवडी परसिरात घडला आहे. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना एका वाहनात १२ लाख रुपयांची रोख रक्कम मिळाली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास शिवडी पोलीस करत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

शिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक चंदनशिवे आणि त्यांचे पथक गस्त करीत असता पांढऱ्या रंगाच्या टुरिस्ट होन्डा एक्सेंट प्राईम मोटार कार क्रमांक एम.एच. ०४ जे.के. २२६३ या वाहनाची तपासणी केली. या वाहनात जुबेर समिउल्ला खान (वय २४), सय्यद शनबाज मोहम्मद शहा आलम (वय २५), युसुफ उस्मान शेख (वय ३०) आणि अकबर सलिम पठाण (वय ३१) होते. या इसमांपैकी जुबेर समिउल्ला खान यांच्याजवळ शोल्डर बॅग होती. या बॅगमध्ये पैसे असल्याचे सांगितल्याने उपरोक्त नमुद इसमांना ताब्यात घेऊन शिवडी पोलीस ठाणे येथे चौकशीकरीता आणण्यात आले. यानंतर दोन पंच बोलावुन त्यांच्यासमक्ष पंचनामा केला असता बॅगमध्ये एकुण रुपये १२,०१,५००/- (अक्षरी रुपये बारा लाख एक हजार पाचशे) इतकी रक्कम आढळुन आली. याबाबत विचारणा केली असता सदर इसमाने ही रक्कम तो करीत असलेल्या धंदयासाठी जमा केल्याचे सांगितले. परंतू, सदरची रक्कम धंद्यासाठी कोणाकडून जमा केली? याबाबत काही एक समाधानकारक माहिती दिली नाही. याबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असुन आयकर विभागाचे उप आयुक्त अधिक चौकशी करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -