घरमनोरंजन‘तेरी मेरी डोरियां’ मालिकेच्या मुख्य जोडीला दीपिका-रणवीरने केलेय प्रेरित

‘तेरी मेरी डोरियां’ मालिकेच्या मुख्य जोडीला दीपिका-रणवीरने केलेय प्रेरित

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील ‘तेरी मेरी डोरियां’ मालिका त्यांच्या भव्य टेलिव्हिजन प्रीमियरसाठी सज्ज आहे आणि 3 मोंगा बहिणी आणि 3 ब्रार बंधू यांच्यातील विरोधाभासी तरीही रोमांचक केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा शो त्याच्या भव्य व्हिज्युअल आणि भव्य सेटअपसह जितका फिल्मी आहे, तितकाच यातील जोडप्यांच्या केमिस्ट्रीमध्ये देखील
बॉलीवूडचा स्पर्श आहे, ज्यामुळे शोचे सौंदर्य वाढते.

मोंगा बहिणी- ब्रार भाऊ यांची ही जोडी आपल्याला बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे दीपिका-रणवीरची आठवण करून देतात. आत्तापर्यंत, प्रेक्षकांनी ‘तेरी मेरी डोरियां’चे अनेक प्रोमोज पाहिले आहेत आणि त्यातील साहिबाची सुंदरता आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध पार्श्वभूमी त्यांना दीपिका पदुकोणची आठवण करून देते, तर अंगद, जो प्रशस्त आणि भौतिकदृष्ट्या श्रीमंत कुटुंबातील आहे, रणवीर सिंहसारखा वाटतो.

- Advertisement -

आपल्याला माहिती आहे की, दीपिका पादुकोण सुंदर आणि स्वभावत: शांत आहे मात्र त्याच वेळी, रणवीर सिंह ऊर्जा आणि  उत्साही आहे! असे म्हणतात की, जोड्या स्वर्गात बनतात, स्टारप्लसने ‘तेरी मेरी डोरियां’ची जोडीही काही कमी नाही यावर विश्वास निर्माण केला आहे. ‘तेरी मेरी डोरियाँ’ मालिकेचे शूटिंग पंजाबमधील एका अतिशय सुंदर ठिकाणी सुरु आहे.


हेही वाचा :

प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाचा पोस्टर झाला ट्रेंड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -