घरमनोरंजन'घाणेकर आणि माझं वैर नव्हतं, होते ते वैचारिक मतभेद'

‘घाणेकर आणि माझं वैर नव्हतं, होते ते वैचारिक मतभेद’

Subscribe

माझे आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे कधीच वैर नव्हते. आम्ही मित्र होतो. मात्र, आम्हाला एकमेकांची मते पटत होती, असे नाही, अशी प्रतिक्रिया डॉ. श्रीराम लागू यांनी काशिनाथ घाणेकर यांच्याबाबत दिली आहे.

‘आणि काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट सध्या तुफान गाजत आहे. या चित्रपटात अभिनेता डॉ. श्रीरामू लागू यांचीही व्यक्तीरेखा दाखवण्यात आली आहे. अभिनेता सुमीत राघवन यांनी लागू यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आले असून आपण हा चित्रपट आवर्जून पाहिला असल्याचे डॉ. लागू सांगतात. याबाबत बोलताना डॉ. लागू म्हणाले, ‘माझे आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे कधीच वैर नव्हते. आम्ही मित्र होतो. मात्र, आम्हाला एकमेकांची मते पटत होती, असे नाही. न पटलेल्या गोष्टी आम्ही एकमेकांना सांगायचो. आमची अभिनयाची शैलीच वेगवेगळी होती. दोघांनी एकमेकांची अनेक नाटके पाहिली आणि त्यावर चर्चाही केली’, अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकमत वृत्तपत्राला दिली आहे.

वाचा :‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’साठी मनसे मैदानात

- Advertisement -

आज त्यांचा ९१ वा वाढदिवस 

डॉ. श्रीराम लागू यांचा शुक्रवार, १६ नोव्हेंबर रोजी ९१ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांनी नाटक, चित्रपट क्षेत्रातील मुशाफिरी, कला क्षेत्रातील राजकारणाच्या हस्तक्षेपाला असलेला ठाम विरोध आणि मी नास्तिक आहे, अशी खंबीर भूमिकाही त्यांनी मांडली. परमेश्वराला रिटायर करा, या माझ्या विधानावर मी आजही ठाम आहे. ते विधान मागे घेण्याचे काहीत कारण नाही. परमेश्वर हा केवळ माणसाच्या डोक्यात चाललेला विचार आहे, असे मला वाटते.

वाचा : …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सुपरस्टारातील माणसाची गोष्ट

- Advertisement -

वाचा : काशिनाथ घाणेकर साकारायला मिळणे माझे भाग्यच – सुबोध भावे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -