घरमुंबई'सरकारला झाडं लावण्यात नाही तर पोस्टरबाजीमध्ये रस'

‘सरकारला झाडं लावण्यात नाही तर पोस्टरबाजीमध्ये रस’

Subscribe

अज्ञातांनी लावलेल्या आगीत हजारो झाडं खाक झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी फेसबुकच्या माध्यमातून सरकारला जाब विचारला आहे.

भाजप सरकारनं सत्तेत आल्यानंतर झाडे लावा झाडे जगवा म्हणत ५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवले. पण लावलेली झाडं जगवण्याबाबत काय? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. त्यामध्ये आता शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकांनी मोठ्या कष्टानं लावलेली झाडं सरकारला जगवता येत नसतील तर ५० कोटी वृक्ष लागवडीचे उदिष्ट कसं पूर्ण करणार? असा सवाल केला आहे. सरकारनं राबवलेल्या वृक्ष लागवडीअंतर्गत खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकांच्या साथीनं हजारो झाडं लावली. पण, अज्ञातांनी लावलेल्या आगीत झाडं खाक झाल्यानं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून खासदार शिंदे यांनी हा जाब विचारला आहे.

- Advertisement -

अंबरनाथ जवळच्या नेवाळी परिसरातील डोंगरावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून हजारो झाडं लावली होती. मात्र, त्यानंतर अज्ञातांनी लावलेल्या आगीत झाडं जळून खाक झाली होती. त्यावेळी देखील शिंदे यांनी यावर संताप व्यक्त केला होता. यानंतर बुधवारी पुन्हा एकदा अज्ञातांनी लावलेल्या आगीत हजारो झाडं खाक झाली आहेत. लावलेल्या झाडांपैकी ७० टक्के झाडं जळाली आहेत. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी वनविभागाला फेसबुक पोस्ट लिहत जाब विचारला आहे. शिवाय वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -