घरमनोरंजनVideo : करवा चौथ साजरा करताना राखी सावंत रडली कारण....

Video : करवा चौथ साजरा करताना राखी सावंत रडली कारण….

Subscribe

सध्या बॉलिवूडकरांचे करवा चौथचे फोटो व्हायरल होत आहेत. अगदी प्रियांका चोप्रापासून ते अनुष्का शर्मापर्यंत सगळ्यांनीच करवा चौथ साजरा केला. या सगळ्यात तुमच्या लक्षात आहे का की आपल्या राखी सावंतचाही या वर्षी पहिला करवा चौथ होता. राखीनेदेखील तिच्या लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला आहे आणि व्हिडिओ शेअर करत सगळ्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

- Advertisement -

आपल्या ड्राम्यांमुळे आणि सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. काही दिवसांपासून राखी सतत चर्चेत असते ती म्हणजे तीच्या लग्नामुळे राखी सावंतने गुपचूप लग्न केले ही चर्चा गेले कित्येक दिवस रंगत आहे. मात्र या ड्रामा क्विनच्या लग्नावर कोणाचाही विश्वास नव्हता.लंडनमध्ये राहणाऱ्या रितेश नावाच्या मुलाशी लग्न केल्याचं खुद्द राखीनं काही महिन्यांपूर्वी जाहीर केलं होतं. ती लवकरच पतीकडे लंडनला राहायला जाणार असल्याचंही ती म्हणाली होती. परंतु, सध्या ती भारतात असून लंडनमध्ये असलेल्या पतीसाठी तिनं उपवास केला होता आणि करवा चौथही साजरी केली होती.

- Advertisement -

राखीला अश्रू अनावर

करवात चौथ साजरी करताना राखीने अनेक व्हीडीओ शेअर केले आहेत. यातील एका व्हीडीओत ती रडताना दिसत आहे. खरतर राखीचा पहिलाच करवा चौथ आहे. यावेळी राखी रडायला लागली आहे.

करवा चौथसाठी राखीची खास तयारी

बनारसी साडी, हातात चुडा, सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र अशा पेहरावात राखीनं व्हिडिओ शूट केला आहे. ‘माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना करवा चौथच्या शुभेच्छा…माझ्या आयुष्यातील ही पहिली करवा चौथ आहे आणि मी दिवसभर माझ्या पतीसाठी उपवास केला होता. माझे पती खूप चांगले आहेत. माझ्या आयुष्यात मी प्रचंड आनंदी आहे. माझे पती तर ‘नंबर वन’ आहेत कारण माझी निवड कधीच चुकणार नाही. माझे पती मला देवाने दिलेली भेट आहे. ‘ असं म्हणत तिनं सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -