घरदेश-विदेशसोनिया गांधींची सभा रद्द; काँग्रेसचं चाललंय काय? मतदारांचा प्रश्न

सोनिया गांधींची सभा रद्द; काँग्रेसचं चाललंय काय? मतदारांचा प्रश्न

Subscribe

हरयाणामध्ये आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, ती सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

येत्या २१ ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळपास दहा सभा आयोजित करण्यात आल्या तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या २० सभा आयोजित करण्यात आल्या. भाजपसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही तितक्याच प्रभावीपणे प्रचार सुरु आहे. मात्र, काँग्रेस प्रचारामध्ये कमी पडताना दिसत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी फक्त एका दिवशी महाराष्ट्र दौरा केला. मात्र, हरयाणात काँग्रेसची तशी देखील सभा अध्यापही आयोजित करण्यात आलेली नाही. त्यामुळे काँग्रेसने अगोदरच हार मानली आहे का? असा प्रश्न मतदारांकडून विचारला जात आहे. हरयाणामध्ये आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, ती सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – ‘आयत्या बिळात चंदूबा’; राष्ट्रवादी आणि भाजपचा सोशल वॉर

- Advertisement -

ऐनवेळी बदल केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज संध्याकाळी हरयाणा येथे पहिली प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. हरयाणा येथील महेंद्रगड येथे आज त्या प्रचाराप्रत्यर्थ येणार होत्या. मात्र, सोनिया गांधी यांची ही सभा रद्द होऊन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ही सभा घेणार आहेत, अशी माहिती काँग्रेसकडून सांगण्यात आली आहे. ऐनवेळी बदल करण्यात आल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्यांमध्ये देखील यासंदर्भात चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्र आणि हरयाणाच्या विधानसभा निवडणुकीकडे काँग्रेस पक्षाचे लक्ष नसल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. याशिवाय राहुल गांधी प्रचारकाळात विदेश दौऱ्यावर गेले होते. यावरुनही भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -