घरमनोरंजन‘दृश्यम 2’ने अक्षय कुमारच्या तीन ब्लॉकब्लस्टर चित्रपटांना देखील टाकलं मागे

‘दृश्यम 2’ने अक्षय कुमारच्या तीन ब्लॉकब्लस्टर चित्रपटांना देखील टाकलं मागे

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू यांची मुख्य भूमिका असणारा ‘दृश्यम 2’ मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मागील महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अनेक महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास 26 दिवस झाले असून अजूनही बॉक्स ऑफिसवर हा करोडोंची कमाई करत आहे.

‘दृश्यम 2’ने जगभरातून करणार 300 कोटींचा टप्पा पार
श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि अजय देवगण यांचा ‘दृश्यम 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. 18 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 21.59 कोटींची कमाई केली. तर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 64 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील ‘दृश्यम 2’ने करोडोंची कमाई केली होती. सोमवारी या चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 297.50 कोटी झाली आहे. तर भारतातील बॉक्स ऑफिसवर 247.50 ची एकूण कमाई करण्यात आली आहे. चित्रपटाची वाढती कमाई पाहून निर्माते देखील खूप खूश आहेत.

- Advertisement -

‘दृश्यम’ ने देखील जिंकलं होतं प्रेक्षकांचं मन
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम’ 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. या चित्रपटात श्रिया सरन, इशिता दत्ता, तब्बू दिसून आल्या होत्या. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती.

अक्षय कुमारच्या तीन चित्रपटांना टाकलं मागे
‘दृश्यम 2’ ने अक्षय कुमारच्या तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. यामध्ये ‘मिशन मंगल’, ‘सूर्यवंशी’ आणि ‘हाऊसफुल 4’ यांचा समावेश आहे. ‘मिशन मंगल’ने जगभरात 287.18 कोटींची कमाई केली, तर ‘हाऊसफुल 4 ने 291.80 कोटींची कमाई केली. त्याच वेळी, ‘सूर्यवंशी’ ने 291.14 कोटी कमावले होते.

- Advertisement -

 


हेही वाचा :

उर्फी जावेदच्या फॅशनला कंटाळून वकिलानेच केली तक्रार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -