घरताज्या घडामोडीरत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस ३१ मार्चपर्यंत रद्द; प्रवाशांना मोठा फटका

रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस ३१ मार्चपर्यंत रद्द; प्रवाशांना मोठा फटका

Subscribe

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस मोठ्या कालावधीसाठी रद्द करण्यात आली आहे. त्यानुसार, ३१ मार्चपर्यंत ही गाडी रद्द करण्यात आली आहे. रत्नागिरी ते मडगाव जंक्शनदरम्यान कोकण रेल्वेकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस मोठ्या कालावधीसाठी रद्द करण्यात आली आहे. त्यानुसार, ३१ मार्चपर्यंत ही गाडी रद्द करण्यात आली आहे. रत्नागिरी ते मडगाव जंक्शनदरम्यान कोकण रेल्वेकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरी ते मडगाव एक्स्प्रेसच्या दोन्ही बाजुंच्या फेऱ्या ३१ मार्च २०२३ पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आल्या आहेत. (Ratnagiri To Madgaon Express On Konkan Railway Route Temporarily Canceled Till March 31)

ऐन नाताळच्या सुट्टीत रत्नागिरी ते मडगाव एक्स्प्रेसच्या दोन्ही बाजुंच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच, नव्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या आंगणेवाडी जत्रेनिमित्त मुंबईसह राज्यभरातून अनेक नागरिक कोकणात जात असतात. त्यावेळी मध्य रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त गाड्या सोडण्यात येतात. मात्र, या गाड्यांचे आरक्षणही फुल झालेले असते. त्यामुळे ऐनवेळी प्रवाशांना इतर वाहतूक सुविधांनी प्रवास करावा लागतो. परंतु, ऐन रजेच्या काळातच कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या गाड्यांच्या फेऱ्या आधी ३१ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. पण दुरुस्तीचे काम लांबणार असल्याने ३१ मार्चपर्यंत फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार, १०१०१/ १०१०२ रत्नागिरी – मडगाव जंक्शन – रत्नागिरी डेली एक्स्प्रेस तात्पुरती रद्द करण्यात आली होती. यात आता कालावधीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. रेल्वे क्रमांक १०१०१ आणि १०१०२ रत्नागिरी – मडगाव जं. – रत्नागिरी डेली एक्स्प्रेस ३१ अर्थात शुक्रवारपर्यंत तात्पुरती रद्द करण्यात आली होती. मात्र, आता रत्नागिरी आणि मडगाव विभागादरम्यान सुरू असलेल्या सुरक्षा देखभाल कामामुळे ही गाडी रद्द करण्यात आली.

रत्नागिरी ते मडगाव या दरम्यान चालविण्यात येणाऱ्या १०१०१ रत्नागिरी-मडगाव आणि १०१०२ मडगाव-रत्नागिरी या दोन गाड्या तात्पुरत्या रद्द केल्याचे अनेकांची गैरसोय होत आहे. रात्री येणारी रत्नागिरी – दादर पॅसेंजर रत्नागिरीपर्यंत धावत आहे. त्यामुळे यातून अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक प्रवास करत करत असून, त्यांना पुढे जाण्यास अडचणी येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. शिवाय, दुपारी येथून सुटणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर हीच गाडी पुढे रत्नागिरी इथे तासभराच्या थांब्याने रत्नागिरी मडगाव म्हणून चालविण्यात येत होती. आता ती रद्द करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महाविकास आघाडीच्या महामोर्चाच्या ठिकाणात बदल; असा निघेल मोर्चा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -