घरमनोरंजनबधाई हो! डेलीसोप क्वीन एकता कपूर झाली 'आई'

बधाई हो! डेलीसोप क्वीन एकता कपूर झाली ‘आई’

Subscribe

सरोगसीच्या माध्यमातून ती आई बनली असून, तिने दोन दिवसांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

‘डेलीस्कोप क्वीन’ अशी ओळख असलेली एकमेव निर्माती अर्थात एकता कपूर आई बनली आहे. एकताने नुकतीच सोशल मीडियावरुन याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकता कपूर ‘आई’ होणार असल्याची कूजबूज होती. मात्र, एकताने आणि तिच्या कुटुबियांनी याविषयी कमालीची गुप्तता पाळली होती. मात्र, आता आपण आई झाल्याचं एकताने जाहीर केलं आहे. सरोगसीच्या माध्यमातून ती आई बनली असून, तिने दोन दिवसांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. एकता कपूरचा भाऊ तुषार कपूर यानेही सरोगसीच्या माध्यमातून मुलाला जन्म दिला होता. त्यापाठोपाठ आता मोठी बहिणही सरोगसीद्वारे ‘सिंगल मदर’ बनली आहे.

लग्न न करता आजवर सिंगल राहिलेल्या एकता कपूरला आई होण्याची मात्र खूपच इच्छा होती. त्यामुळे तिने सरोगसीच्या माध्यमातून आई होण्याचा निर्णय घेतला. एका खासगी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, एकताने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘आई बनण्यासाठी मानसिकरित्या पूर्णपणे तयार होण्याची मी वाट पाहत होते. ज्यावेळी माझ्या मनाची तयारी झाली त्यावेळी मी आई होण्याचं नक्की केलं.’ दरम्यान, एकताचा भाऊ तुषार कपूर याच्याप्रमाणेच तिची अत्यंत जवळची मैत्रीण साक्षी तन्वर हिनेही सरोगसीच्या माध्यमातून मध्यंतरी एका मुलीली जन्म दिला होता. त्यावेळी एकताने तिचा आणि साक्षीचा एक फोटो शेअर करत तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या होत्या. आज स्वत: एकता कपूर आई होण्याचं सुख अनुभवते आहे. टेलिव्हिजन विश्वातून तसंच मनोरजंन क्षेत्रातील दिग्गजांकडून एकतावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

एकता कपूर तिचा भाचा लक्ष्य कपूर यासोबत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -