घरदेश-विदेशराजस्थानमध्ये महिलेने एकाच वेळी दिला ५ मुलांना जन्म

राजस्थानमध्ये महिलेने एकाच वेळी दिला ५ मुलांना जन्म

Subscribe

राजस्थानमध्ये एका महिलेने एका वेळी ५ मुलांना जन्म दिला. दुर्मिळ घटनांपैकी एक घटना असल्याचे डॉक्टर्सनी यावेळी सांगितले.

राजस्थान मधील जयपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये एका महिलेने शनिवारी एक साथ ५ मुलांना जन्म दिला. जनाना हॉस्पिटलच्या अधिक्षक लता रजौरिया यांनी सांगितले की, “या ५ मुलांच्या जन्माच्या वेळी एक मूल मृत जन्माला आले. तसेच एका मुलाला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित तीन मुलांनासुद्धा निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “शुक्रवारी रात्री (२५) महिलेला प्रसवकळा सुरु झाल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी त्या महिलेने ५ पूर्ण वाढ न झालेल्या मुलांना जन्म दिला. यामध्ये एका मृत मुलाचा जन्म झाला.”

दुर्मिळ प्रकरणांपैकी एक प्रकरण

जनाना हॉस्पिटलच्या अधिक्षक लता रजौरिया यांनी सांगितले की, “जन्माला आलेल्या दोन मुली आणि दोन मुलांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. सर्व मुलांचे वजन फारच कमी आहे. बाळंतीण महिला सांगनेर येथे राहते. मृत झालेले अर्भक मुलगा होता.” हॉस्पिटलच्या डॉक्टर्सने सांगितले की, “काही दुर्मिळ प्रकरणांपैकी हे एक प्रकरण आहे. यापूर्वीसुद्धा अशी प्रकरणं घडली आहेत. या प्रकरणांमध्ये एका वेळी दोन, तीन, चार नाही तर तब्बल नऊ मुलांनी एकसाथ जन्म घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -