घरमनोरंजनअखेर तो क्षण आलाच, श्रद्धा कपूर अडकणार लग्नबंधनात, शक्ती कपूरनी सांगितली डेट?

अखेर तो क्षण आलाच, श्रद्धा कपूर अडकणार लग्नबंधनात, शक्ती कपूरनी सांगितली डेट?

Subscribe

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या बातम्यामुळे चर्चेत आहे. अशातच श्रद्धा कपूर लवकरचं तिचा बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र श्रद्धाच्या कुटुंबियांनी अशा चर्चा स्पष्टपणे नाकारल्या आहेत. श्रद्धाच्या बाजूनेही यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अशातच श्रद्धा कपूरचे वडील शक्ती कपूर यांनी तिच्या आणि रोहन श्रेष्ठाच्या लग्नाच्या विषयावर मौन सोडले आहे. शक्ती कपूर म्हणाले की, श्रद्धाचे लग्न ठरल्यास आनंदच होईल, पण लग्न करायचे की नाही हे श्रद्धावर अवलंबून आहे. रोहनने अद्याप मुलीचा हात मागितलेला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

- Advertisement -

श्रद्धा आणि रोहनच्या लग्नाविषयी बोलताना शक्ती कपूर म्हणाले की, रोहन त्यांच्या कुटुंबातील एक जवळचा मित्र आहे. शक्ती कपूर त्याच्या वडीलांना अनेक वर्षांपासून ओळखतात. अनेकदा रोहन त्यांच्या घरी देखील जातो. मात्र आजपर्य़ंत रोहनवे त्यांच्याकडे श्रद्धाचा हात मागितलेला नाही. आज कालची मुलं स्वत:चा निर्णय स्वत: घेतात. अशातच जर श्रद्धाने किंवा मुलगा सिद्धांतनेही स्वत:चा जोडीदार शोधल्याचे सांगितले तरी दोघांनाही आनंदाने सहमती देईन.

शक्ती कपूर पुढे म्हणाले, मी नकार देण्याचे कारण काय? पण यावेळी मुलांना त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. लग्न हा एक अतिशय महत्वाचा निर्णय आहे आणि आजकाल लोक ज्या प्रकारे ब्रेकअप करत आहेत त्यामुळे मला खूप फरक पडतो, म्हणून लग्न करण्यापूर्वी तुम्ही काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.

- Advertisement -

कोरोनाविरोधी लसीकरणात सर्वप्रथम शिक्षकांसह शालेय कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या – WHO


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -