घरताज्या घडामोडीआता हॉल किंवा लॉनमध्ये नाही तर धावत्या मेट्रोत बांधणार लग्नाच्या गाठी

आता हॉल किंवा लॉनमध्ये नाही तर धावत्या मेट्रोत बांधणार लग्नाच्या गाठी

Subscribe

पुणे मेट्रोमुळे लोकांना लग्न समारंभ थेट मेट्रोमध्येच साजरे करता येणार आहेत आणि ते ही हॉलच्या खर्चाच्या अर्ध्या खर्चात.

पुणेकरांच्या प्रतिक्षेत असणारी पुणे मेट्रो (Pune Metro) लवकरच पुणेकरांच्या सेवेत येणार आहे त्यासाठी प्रशासनाने त्यांच्या कामाचा वेग देखील वाढवत आहे. या मेट्रोचा पुणेकरांना आणखी एक महत्त्वाचा फायदा होणार आहे तो म्हणजे पुणेकर आता मेट्रोमध्ये चक्क लग्न समारंभ देखील पार पाडू शकणार आहेत. खरंतर लग्न समारंभ (Wedding ceremony) म्हटले की पहिल्यांदा हॉल मिळवण्यापासून सुरुवात होते. चांगला हॉल मिळाला तर पैशांची अडचण येते आणि पैशांची अडचण नसली तरी मनासारखा हॉल मिळत नाही. मात्र पुणे मेट्रोमुळे लोकांना लग्न समारंभ थेट मेट्रोमध्येच साजरे करता येणार आहेत आणि ते ही हॉलच्या खर्चाच्या अर्ध्या खर्चात. त्यामुळे आता हॉल किंवा लॉनमध्ये नाही तर धावत्या मेट्रोत बांधणार लग्नाच्या गाठी बांधल्या जाणार आहेत.

- Advertisement -

केवळ लग्नच नाही तर लग्नाची बोलणी,साखरपुडा,वाढदिवस, अॅनिव्हर्सरी देखील मेट्रोमध्ये साजरे करता येणार आहेत. डिसेंबर अखेरीस मेट्रो रेल्वे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते वल्लभनगर आणि वनाझ ते गरवारे महाविद्यालयादरम्यान धावणार आहे. मेट्रोच्या या अनोख्या उपक्रमामुळे पुणे मेट्रो आकर्षणाचा विषय ठरणार आहे.

- Advertisement -

पुणेच नाही तर, नागपूरमध्ये देखील असा उपक्रम राबवण्यात येत आहेत. नागपूर मेट्रोमध्ये १५ ऑगस्ट रोजी मेहंदी सोहळा आयोजित करण्यात आलेला ज्याला महिलांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला होता. महामेट्रोचा हा उपक्रम पुण्यातील तब्बल ३० रेल्वे स्थानकात राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – krishna janmashtami 2021:…तर दादरमध्ये दहीहंडी साजरी करू; मनसे आक्रमक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -