घरमनोरंजनFighter : विकेंडच्या भरारीनंतर हृतिकचे 'फायटर' जमिनीवर, प्रेक्षकांकडून थंडा प्रतिसाद

Fighter : विकेंडच्या भरारीनंतर हृतिकचे ‘फायटर’ जमिनीवर, प्रेक्षकांकडून थंडा प्रतिसाद

Subscribe

मुंबई : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनीत ‘फायटर’ चित्रपटगृहांमध्ये झळकल्यानंतर प्रसिद्ध झालेली त्याची समीक्षा खूपच सकारात्मक होती. भावनिक कथानक आणि अप्रतिम सादरीकरणाचे कौतुक झाले. शिवाय, हृतिकचा अभिनयही सिनेरसिकांना आवडला. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप प्रतिसाद मिळाला असला तरी, पहिल्याच दिवशी तशी जोरदार सुरुवात या चित्रपटाची झाली नाही.

हेही वाचा – शिल्पा शेट्टीने पटकावला ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज 2023’ पुरस्कार

- Advertisement -

प्रजासत्ताक दिनी या देशभक्तीपर सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्या दिवशी या चित्रपटाने 41 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला कमावला. शनिवार-रविवार या दिवशी देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी नोंदवली. पण सोमवारी मात्र हृतिकचे फायटर विमान अलगद जमिनीर उतरले. रविवारच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवरील कमाई सुमारे 70 टक्क्यांनी घटली. शिवाय, मंगळवारी देखील प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती समोर येत आहे.

हृतिक रोशनच्या फायटरने रविवारी 30 कोटी रुपयांची कमाई केली. तर, त्या तुलनेत सोमवारी केवळ 8 कोटी रुपये मिळाली. चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन 24.60 कोटी रुपयांच्या तुलनेत देखील ही कमाई कमीच आहे. मंगळवारचा ट्रेंड रिपोर्ट ध्यानी घेता सहाव्या दिवशी या चित्रपटाला थंडाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. ‘फायटर’ चित्रपटाने मंगळवारी जवळपास 7 कोटी रुपयांच्या आसपास कमावले. ही रक्कम सोमवारच्या तुलनेत देखील कमी आहे. एकूणच सहा दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 137 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. पहिल्या आठवड्यात 145 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यताही धुसर होत चालली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Bhushan : अशोक सराफांसोबत काम करण्याचे माझे भाग्य; भुजबळांनी सांगितला किस्सा

फायटर हा यावर्षीचा पहिलाच बिग बजेट बॉलिवूड चित्रपट आहे. त्याचे मार्केट सुमारे 250 कोटी रुपयांचे असल्याचे म्हटले जाते. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्यासारखे मोठे स्टार्स आणि सिद्धार्थ आनंदसारख्या ब्लॉकबस्टर दिग्दर्शक असल्याने ‘फाइटर’ बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडेल, अशी अपेक्षा होती. पण आत्तापर्यंतचा व्यवसाय पाहिला तर हा चित्रपट सरासरीपेक्षा कमी वेगाने वाटचाल करत असल्याचे दिसते.

या वीकेंडला अन्य कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित न झाल्यामुळे हृतिकच्या चित्रपटाला नक्कीच फायदा होईल, असे ठोकताळे व्यक्त करण्यात येत होते. पण तरीही त्यातून काही मोठे घडताना दिसत नाही. किमान 300-400 कोटी रुपयांचा गल्ला जमा होईल, अशी ‘फायटर’कडून अपेक्षा होती. सिद्धार्थ आनंदच्या या नव्या चित्रपटाने ‘पठाण’ नाही तर किमान ‘वॉर’सारखी कमाई तरी करावी, अशी अपेक्षा व्यवसाय विश्लेषकांना होती. पण ‘फायटर’ ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्यानुसार 200 कोटी रुपयांचा आकडा गाठणेही अवघड वाटते आणि असे झाले तर ‘फायटर’ला यासाठी खूप संघर्ष करावा लागेल.

हेही वाचा – Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -