घरमनोरंजनDeepika Birthday : 'चेन्नई एक्सप्रेस'पासून 'बाजीराव मस्तानी'पर्यंत 'हे' आहेत दीपिकाचे सुपरहिट चित्रपट

Deepika Birthday : ‘चेन्नई एक्सप्रेस’पासून ‘बाजीराव मस्तानी’पर्यंत ‘हे’ आहेत दीपिकाचे सुपरहिट चित्रपट

Subscribe

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोणचा उद्या 38 वा वाढदिवस आहे. 5 जानेवारी 1986 रोजी डेन्मार्क येथे तिचा जन्म झाला होता. दीपिका पदुकोणने 2004 साली मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली होती. दीपिकाला बॉलिवूडमध्ये आता जवळपास 14 वर्षं झाली आहेत. आज दीपिका बॉलिवूडमधील आघाडींच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. आत्तापर्यंत दीपिकाने बॉलिवूडला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दीपिकाने शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दीपिकाचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर तिने इतर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं.

दीपिकाचे सुपरहिट चित्रपट

  • ओम शांती ओम

Om Shanti Om | Netflix2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात शाहरुख खान देखील मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने 78.16 कोटी कमावले होते.

- Advertisement -
  • ये जवानी है दिवानी

Yeh Jawaani Hai Deewani Memories: 5 Life-Lessons The Movie Taught Us!2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रणबीर कपूर  देखील मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने 177 कोटी कमावले होते.

  • चेन्नई एक्सप्रेस

Chennai Express Anniversary: फिल्म के ये 5 डायलॉग इसे बनाते हैं खास, आज भी इन्हें सुनकर2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटाने 207.69 कोटी कमावले. या चित्रपटात दीपिकासोबक शाहरुख मुख्य भूमिकेत होता.

- Advertisement -
  • राम लीला

Guns and Roses – A review of Ram Leela – Madraswallah2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रामलीला’ चित्रपटाने 112 कोटी कमावले होते. या चित्रपटात दीपिकासोबत रणवीर सिंह मुख्य भूमिकेत होता.

  • बाजीराव मस्तानी

बाजीराव मस्तानी : इतिहास आधारित एक गल्प कथा जिसमें ज्यादा पल्प नहीं है!2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाने 183 कोटी कमावले होते. या चित्रपटात दीपिकासोबत प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंह देखील मुख्य भूमिकेत होता.

  • पद्मावत

Padmaavat Turns 3: Ghoomar To Jauhar, 5 Scenes That Still Give Us Goosebumps2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ चित्रपटाने 282 कोटी कमावले होते. या चित्रपटात दीपिकासोबत शाहिद कपूर आणि रणवीर सिंह देखील मुख्य भूमिकेत होता.

 


हेही वाचा :

भर मंडपात आमीरने केलं दुसऱ्या पत्नीला किस; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -