घरक्रीडाIND vs SA : भारताचा केपटाऊनमध्ये ऐतिहासिक विजय; मालिका ड्रॉ करणारा रोहित...

IND vs SA : भारताचा केपटाऊनमध्ये ऐतिहासिक विजय; मालिका ड्रॉ करणारा रोहित शर्मा दुसरा कर्णधार

Subscribe

केपटाऊन : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सात विकेट्स राखून जिंकला आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या विजयासाठी भारताला 31 वर्षे वाट पाहावी लागली. भारताने आतापर्यंत केपटाऊनमध्ये एकदाही कसोटी सामना जिंकला नव्हता. अखेर या वर्षी भारताने इतिहास बदलला आहे. भारताने कसोटी मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवली आहे. (IND vs SA Historic win for India in Cape Town Rohit Sharma is the second captain to draw a Test series)

हेही वाचा – VIDEO:IND vs SA: केपटाऊनमध्ये ‘राम सिया राम’ गाणं वाजलं; कोहलीने जोडले हात, व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -

भारताच्या या विजयात मोहम्मद सिराज, जसप्रित बुमराह यांनी महत्वाची भूमिका बजावली. सिराजने पहिल्या डावात 6 बळी घेतले, तर बुमराहने दुसर्‍या डावात 6 फलंदाजांना माघारी धाडले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवरच आटोपला. यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात 153 धावा केल्या आणि 98 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. मात्र दुसर्‍या डावात अ‍ॅडम मार्करमच्या शतकाच्या जोरावर यजमान संघाने 176 धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य मिळाले, जे भारतीय संघाने 3 विकेट गमावून सहज गाठले.

- Advertisement -

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पहिल्या डावात 153 धावांत गुंडाळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्याच दिवशी दुसर्‍या डावात फलंदाजीसाठी उतरला. दिवसअखेर आफ्रिकेने 3 बाद 62 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसअखेर आफ्रिका 36 धावांनी पिछाडीवर होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कहर केला. त्याने 6 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला 176 धावांत सर्वबाद करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

बुमराहशिवाय मुकेश कुमारने 2 आणि सिराज, प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 1 विकेट घेतली. दुसर्‍या डावात दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करमने शतक झळकावले. त्याने 103 चेंडूत 17 चौकार आणि 2 षटकारांसह 106 धावा केल्या, परंतु इतर कोणत्याही फलंदाजाने मार्करमला साथ दिली नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने दुसर्‍या डावात 176 धआवा केल्या आणि भारताला 79 धावांचे लक्ष्य मिळाले. जे रोहित ब्रिगेडने 12 षटकांत गाठले आणि दुसरा दिवस संपण्यापूर्वीच सामना जिंकला. चौथ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने भारताकडून सर्वाधिक 28 धावांची खेळी खेळली.

भारतीय गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी

या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी आश्चर्यकारक कामगिरी करत सर्व 20 विकेट्स घेतल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने पहिल्या डावात , तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसर्‍या डावात जसप्रीत बुमराहने भारताकडून सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. याशिवाय मुकेश कुमारला 2, तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

हेही वाचा – Maharashtra Politics : 400 जागा जिंकणार हे BJP कोणत्या आधारावर सांगते? Sharad Pawar यांचा सवाल

केपटाऊनमध्ये ऐतिहासिक विजय

मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यासारखे कर्णधार जे करू शकले नाहीत, ते रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली केले. कर्णधार म्हणून रोहित शर्माने केपटाऊमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर दुसऱ्यांदा कसोटी मालिका अनिर्णित ठेवण्यात भारतीय संघाला यश आले. गेल्या वेळी 2010-11 मध्ये असे घडले होते. तेव्हा महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता. भारतीय संघाने पहिला कसोटीत पराभवाला सामोरे गेल्यानंतर दुसरी कसोटी जिंकली होती आणि तिसरी कसोटी अनिर्णित राखली होती. महेंद्रसिंग धोनीनंतर दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका बरोबरीत सोडवणारा रोहित शर्मा दुसरा कर्णधार ठरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -