घरमनोरंजन'गदर 2' ची फार मोठी जबाबदारी आहे : उत्कर्ष शर्मा

‘गदर 2’ ची फार मोठी जबाबदारी आहे : उत्कर्ष शर्मा

Subscribe

हर्षदा वेदपाठक

‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटांमध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुलाची भूमिका, म्हणजेच चिरंजीत उर्फ जिते ची भूमिका करणारा उत्कर्ष शर्मा आता मोठा झाला आहे. तो आता गदर 2 मध्ये काम करत आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित गदर 2 हा चित्रपट याच आठवड्यात प्रदर्शित होत आहे. त्याबद्दल उत्कर्ष बरोबर केलेली बातचीत.

ज्या दिवशी गदर दोनचा प्रोमो प्रदर्शित झाला, त्या दिवसापासून त्या चित्रपटाची तुलना हि गदर एक बरोबर होऊ लागली आहे. काय सांगशील त्याबद्दल?

- Advertisement -

गदर एक हा चित्रपट तुफान चालला होता. त्या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड केले. त्यामुळे साहजिकच आहे, चित्रपटाच्या भाग दोनची लोकं आतुरतेने वाट पाहत आहेत. इतकच नव्हे तर गदर एक च्या तुलनेत, हा चित्रपट कुठेतरी अपेक्षा पूर्ण करणारा ठरावा अशी देखील अनेकांची इच्छा आहे. २००१ मध्ये गदर एक प्रेम कथा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यामध्ये फाळणीचे कथानक होते. त्याकाळी देशात देखील एक वेगळेच वातावरण होते. आता गदर दोनचे कथानक हे १९७१ च्या युद्धा सभोवती फिरताना दिसेल. त्या चित्रपटातील अनेक पात्र हि मोठी झालेली आहेत. तसेच देशात देखील आता एक वेगळी परिस्थिती आहे. या चित्रपटाचे नेपथ्य यासह हाणामारी हे गदर 2 चे वैशिष्ट्य ठरणार आहे. सोबतच वडील आणि मुलगा यांचे प्रेम, कौटुंबिक एकोपा हे देखील तुम्हाला येथे पाहायला मिळेल. त्यामुळे गदर एक पेक्षा गदर दोन हा चित्रपट वेगळा आहे असंच मी म्हणेन.

- Advertisement -

बावीस वर्षानंतर तुझा चित्रपट येतोय काय अपेक्षा ठेवल्या आहेस, तु या चित्रपटाकडून?

गदर एक हा चित्रपट तुफान यशस्वी झालेला होता. त्यामुळे गदर दोनचे कथानक निवडताना त्या तोडीचे कथानक मिळाले, तरच आम्ही कामाला सुरुवात करणार होतो. आणि तसे कथानक मिळाल्याने, त्यानंतर गदर दोनच्या कामाची सुरुवात झाली. लॉकडाऊन दरम्यान लेखक शक्तिमान हे बाबांकडे वन लाईन,कथानकासह आले. कथानक आवडल्याने त्यांनी पुढच्या कामाला सुरुवात केली.

माझे बाबा आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा जेव्हा आश्र्वस्थ झाले, तेव्हाच त्या विषयाला घेऊन ते सनी देओल यांना भेटले. सनी सर यांना देखील तो विषय आवडला. त्यानंतर स्क्रिप्ट लिहायला सुरवात झाली. जवळजवळ दीड वर्ष स्क्रिप्टवर काम सुरू होते. गदर 2 हा चित्रपट आम्हाला लार्जेर देन लाईफ बनवायचा होता. त्यामुळे त्या चित्रपटाची मांडणी पण अशा प्रकारे केली की, सगळ्यांना तो पसंत पडेल. इतकच नव्हे तर भावनिकरित्या प्रत्येक जण त्या चित्रपटाबरोबर जोडला जाईल, अशाच प्रकारे गदर 2 तयार झाला. साहजिकच आहे, माझ्या आणि माझ्या सर्वच परिचित या चित्रपटाकडून खूप अपेक्षा करत आहोत.

सनी देओल असताना तुला ॲक्शन करायला कितपत वाव मिळाला?

एकदम थोड्या प्रमाणात ॲक्शन करताना मी तुम्हाला गदर दोन मध्ये दिसेन. तारा सिंग च्या मुलाची भूमिका मी इथे करत आहे. बेटा थोडा तो बाप पर जायेगा हीं… आम्ही एकदम बेसिक ॲक्शन येथे केली आहे. ज्यामध्ये तार आणि वायरचा प्रयोग केलेला नाही. तर प्रामुख्याने, हाताचा प्रयोग सर्वाधिक करण्यात आलेला आहे. मी तुम्हाला जलद गतीने ॲक्शन करताना दिसेन, तर सनी सर हे ठासून ॲक्शन करताना दिसतील.

गदर 2 हा चित्रपट तुझा प्रौढ वयात आल्यावर, पहिला चित्रपट असायला हवा होता असं नाही वाटत तुला?

२०१८ मध्ये, जनियस हा चित्रपट मी केला होता. आणि तोच माझा पदार्पणातला चित्रपट होता परंतु तो चित्रपट काही फारसा चालला नाही. त्यामुळे मी कोणाच्या लक्षात नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, गदर 2 हा चित्रपट माझा पदार्पणातला चित्रपट असायला हवा होता. परंतु आम्ही तेव्हा गदर 2 हा चित्रपट करायच्या विचारातच नव्हतो. खरं सांगायचं तर, जीनियस या चित्रपटाने मी बरंच काही शिकलो. तर चित्रपटाचे मार्केटिंग आणि चित्रपट कधी-कसा प्रदर्शित करायचा हे समजून घेतल्यावर या सगळ्यांना फायदा मी गदर 2 साठी वापरला आहे. कारण जसं मी मागे म्हटलं, माझ्या स्वतःच्या आणि माझ्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येकाच्या आशा अपेक्षा गदर दोन वर लागल्या आहेत.

‘गदर 2’ मध्ये ‘तु सिमरत कौर’ या नवीन मुलीबरोबर काम करताना दिसणार आहेस. तुझ्या वडिलांनी तिच्या बरोबर म्हणे तिन चित्रपटांचा करारनामा केला आहे, ही बातमी खरी आहे काय?

‘गदर 2’ हा चित्रपट फार मोठ्या कथानकाप्रमाणे चित्रित करण्यात आला आहे. आम्ही जवळ जवळ पाचशे मुलींचे ऑडिशन घेतले. कारण आम्हाला कोणालाही प्रशिक्षण देऊन तयार करायला वेळ नव्हता. आम्हाला एक नवीन चेहरा पाहिजे होता. जो कथानक कोणत्या बाजूला जाईल यावर, प्रेक्षकांना कयास लावू देईल. तिची कास्टिंग एका वेगळ्याच प्रकारे झाली. मी आणि बाबा शूटवरून परतत असताना सिमरत, पालनपुर मध्ये दोन दिवसांसाठी होती. तिची ऑडिशन ही मोबाईल वरून करण्यात आली. बाबांनी मला अचानक तिच्याबरोबर ऑडिशन द्यायला सांगितले.
ऐका सुधारित दृश्य आणि संवादासह आमची ऑडिशन झाली. माझे संवाद संपले मात्र तिची ऑडिशन सुरूच राहिली. सिमरत हि खूप चांगली अभिनेत्री आहे. याखेरीज, अभिनेत्री म्हणून आम्हाला जो चेहरा आणि बाकीच्या गोष्टी अपेक्षित होत्या. त्या हिरोईन म्हणून तिच्याकडे असल्याचे आम्हाला दिसून आले. आणि तिची निवड करण्यात आली.


हेही वाचा :

‘धर्मवीर २’ मधून उलगडणार ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट…’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -