घरदेश-विदेशरेल्वे हत्याकांडातील आरोपीबद्दल ओवैसींचा पंतप्रधान मोदींना प्रश्न, म्हणाले - "तो तुमचा..."

रेल्वे हत्याकांडातील आरोपीबद्दल ओवैसींचा पंतप्रधान मोदींना प्रश्न, म्हणाले – “तो तुमचा…”

Subscribe

जयपूर-मुंबई ट्रेनमधील हत्याकांडाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी निशाणा साधला. ओवैसींनी या हत्याकांडातील आरपीएफमधील आरोपी चेतन सिंह याच्याबाबत केंद्र सरकारसमोर काही प्रश्न उपस्थित केले.

नवी दिल्ली : विरोधकांकडून दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेचा आज तिसरा दिवस आहे. काँग्रेसचे आसाममधील खासदार गौरव गोगोई यांनी 26 जुलैला लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. त्यानंतर 8 आणि 9 ऑगस्ट या दोन दिवशी या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. तर आज या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत. पण त्याआधी आज एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रस्तावावर चर्चा केली. यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या जयपूर-मुंबई ट्रेनमधील हत्याकांडाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ओवैसींनी या हत्याकांडातील आरपीएफमधील आरोपी चेतन सिंह याच्याबाबत केंद्र सरकारसमोर काही प्रश्न उपस्थित केले.

हेही वाचा – No-Confidence Motion : NDA तील ‘हा’ घटक पक्ष अविश्वास प्रस्तावाचे करणार समर्थन

- Advertisement -

यावेळी बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, आम्ही मोदी सरकारच्या विरोधात उभे आहोत. आपल्या देशात अलिकडेच जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये एक हत्याकांड झाले. एका वर्दीतल्या दहशतवाद्याने त्याच्या वरिष्ठांसह चार जणांचा खून केला. हा हल्लोखोर रेल्वेच्या डब्यांमध्ये फिरला. त्याने लोकांना पाहून, त्यांचे नाव विचारून, चेहऱ्यावरील दाढी पाहून आणि कपडे पाहून त्यांची हत्या केली. हा हल्लेखोर एवढ्यावरच थांबला नाही. तर तो त्यानंतर प्रवशांना म्हणाला, तुम्हाला या देशात राहायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनांच मत द्यावे लागेल.

तसेच, मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे, हे सगळं पाहून तुमचा विवेक का जागृत झाला नाही? तिकडे हरियाणात हिंसाचार सुरू आहे. जाणीवपूर्वक मुस्लीम समुदायाला लक्ष्य केले जात आहे. मणिपूरमध्ये स्त्रियांवर अत्याचार होत आहे. परंतु, आपले पंतप्रधान त्यावर शांत का आहेत? असे प्रश्न ओवैसी यांच्याकडून उपस्थित करण्यात आले. याशिवाय त्यांनी या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना हरियाणातील दंगली, हिजाबचा मुद्दा आणि मणिपूरमधील हिंसाचारावरून सरकारवर जोरदार टीका केली.

- Advertisement -

काय आहे रेल्वे हत्याकांड?

मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये 31 जुलैच्या रात्री ASI टिकाराम मीणा (वय 58 वर्षे), पोलीस हवालदार नरेंद्र परमार (वय 58 वर्षे), शिपाई अमेय आचार्य (वय 26 वर्षे) आणि शिपाई चेतन सिंह (वय 33 वर्षे) ड्युटीवर होते. या सर्वांची 28 जुलैपासून एक आठवड्याभर मेल पॅसेन्जर गाड्यांवर एस्कॉर्टिंग करण्याची ड्युटी नेमलेली होती. रविवारी रात्री नऊच्या दरम्यान सौराष्ट्र मेल या ट्रेनमधून हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी एक्सॉर्ट करत सूरतपर्यंत गेले आणि सूरतवरुन जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने एक्सॉर्ट करत मुंबईला येत होते तेव्हा आरपीएफ शिपाई चेतन सिंह याने गोळीबार (Firing) करुन एका सहकाऱ्यासह तीन प्रवाशांना ठार केले होते.

या घटनेनंतर असुद्दीन औवेसी यांनी ट्वीट केले होते. यात त्यांनी लिहिले होते की, “हा दहशतवादी हल्ला आहे ज्यात प्रामुख्याने मुस्लिमांना लक्ष्य केले आहे. नरेंद्र मोदींच्या सातत्याने मुस्लिमविरोधी, चिथावणीखोर भाषणांचा हा परिणाम आहे. आरोपी आरपीएफ जवान हा भाजपाचा आगामी निवडणुकीतला उमेदवार असेल का? त्याच्या जामिनाला सरकारचा पाठिंबा असेल का? सुटल्यावर त्याला हार घातले जातील का? मी जर चुकीचा ठरलो तर मला आनंद होईल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -