Eco friendly bappa Competition
घर क्राइम मी पळता-पळता पडले, माझ्या वहिनीने मुलांना वाचवलं..": मणिपूरमधून आणखी एक भयावह कहाणी समोर

मी पळता-पळता पडले, माझ्या वहिनीने मुलांना वाचवलं..”: मणिपूरमधून आणखी एक भयावह कहाणी समोर

Subscribe

मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील एका 37 वर्षीय विवाहित महिलेने आरोप केला आहे की तिला पुरुषांच्या एका गटानं पकडलं. ती तिच्या दोन मुलांसह, भाची आणि वहिनीसह तिच्या जळत्या घरातून पळून जात होती आणि 3 मे रोजी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

मणिपूरमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये आणखी एका घटनेची नोंद झाली आहे. मदत शिबिरात राहणाऱ्या पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मणिपूरमधील अधिकाधिक महिला पोलिसांसमोर येत आहेत आणि त्यांच्यावर झालेल्या क्रूरतेबद्दल सांगत आहेत. ( Another horrifying gang rape case comes to light from violence hit Manipur )

मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील एका 37 वर्षीय विवाहित महिलेने आरोप केला आहे की तिला पुरुषांच्या एका गटानं पकडलं. ती तिच्या दोन मुलांसह, भाची आणि वहिनीसह तिच्या जळत्या घरातून पळून जात होती आणि 3 मे रोजी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

- Advertisement -

या पीडित महिलेने सांगितले की, माझी आणि माझ्या कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी आणि सामाजिक बहिष्कार टाळण्यासाठी मी ही घटना उघड केली नाही. ही पीडित महिला आता विस्थापितांच्या मदत छावणीत राहत आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376D, 354, 120B आणि 34 अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं घडलं काय?

फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट (एफआयआर) नुसार, 3 मे रोजी संध्याकाळी 6.30 वाजता, नराधमांनी महिला आणि तिच्या शेजाऱ्यांची घरे जाळण्यास सुरुवात केली, त्यानंतर पीडित महिला, तिची दोन मुले, भाची आणि वहिनी हे सर्व जण आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले. आपला जीव मुठीत घेऊन पळत असताना या पीडित महिलेने आपल्या भाचीला पाठीवर बसवलं होतं तर स्वत:च्या दोन्ही मुलांचे हात पकडले होते. तिची वहिनीदेखील एका मुलाला घेऊन तिच्या मागे धावत होती. मात्र, धावता धावता, ती अडखळून पडली आणि तिला नराधमांनी गाठलं. परंतु सुदैवानं तिच्या मुलांना वहिनी सोबत घेऊन पुढे पळत पळत सुरक्षित स्थळी पोहोचली होती, असं या पीडित महिलेने आपल्या FIR मध्ये म्हटलं आहे. या महिलेच्या FIR मध्ये असं म्हटलंय की, मी पळता पळता पडले. रस्त्यावर पडलेले होते आणि मला उठतादेखील येत नव्हते… माझी वहिनी धावत माझ्याकडे आली आणि माझ्या भाचीला माझ्या पाठीवरून उचलून धरले. माझे दोन्ही मुलगे पळून गेले, असं त्या पीडितेने आपल्या FIR मध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

“अखेर जेव्हा मी उठण्यात यशस्वी झाले, तेव्हा काही पाच-सहा नराधमांनी मला घेरलं, त्यांनी मला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. माझ्या प्रतिकारानंतरही मला खाली पाडण्यात आलं आणि या नराधमांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली…”अशी आपबिती त्या महिलेनं एफआयआरमध्ये नोंदवली आहे.

या महिलेने म्हटलं आहे की, माझी कोणतीही चूक नसताना माझ्यावर झालेल्या जघन्य गुन्ह्यांमुळे मी खूप आघात आणि असंख्य वेदना सहन केल्या आहेत. नराधमांनी माझ्यावर लैंगिक आणि शारीरिक अत्याचार केले. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या पीडित महिलेनं केली आहे.

मणिपूर पोलिसांनी मंगळवारी सुप्रीम कोर्टात सांगितले की, 3 मे ते 30 जुलै या सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत 6,500 हून अधिक पोलिस केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या पोलिस अहवालानुसार, “जाळपोळ, लूट आणि घरगुती मालमत्तेची नासधूस” या वर्गवारीत बहुसंख्य पोलिस खटले नोंदवले जातात.

ही प्रकरणे आहेत जाळपोळ (4,454), लूटमार (4,148), घरगुती मालमत्तेची नासधूस (4,694), आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान (584), आतापर्यंत हजारो एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा

- Advertisment -