घरताज्या घडामोडीViral Video: स्वतःच्या लेकाला विसरली जेनेलिया वहिणी!

Viral Video: स्वतःच्या लेकाला विसरली जेनेलिया वहिणी!

Subscribe

अभिनेता रितेश देशमुखची पती अभिनेत्री जेनेलिया देशमुख चित्रपटातून प्रेक्षकांना दिसत नसली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय दिसते. छोटे-छोटे रिल्सचे व्हिडिओ जेनेलिया सतत शेअर करत असते. त्यामुळे जेनेलिया नेहमी सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. जेनेलिया इन्स्टाग्रामवरील रिल्स फक्त रितेशसोबतच नाहीतर आपल्या मुलांसोबत आणि मित्र-मैत्रिंणीसोबत देखील करत असते. नुकतेच जेनेलियाने एक रिल्स बनवले आहे, ज्यामध्ये रितेश नसल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

या व्हिडिओमध्ये जेनेलियासोबत रितेश ऐवजी तिचा मुलगा दिसत आहे. या व्हिडिओमधील जेनेलिया आणि तिच्या मुलाची मस्ती चाहत्यांना खूपच आवडत आहे. त्यामुळे व्हिडिओला चाहते खूप लाईक्स करत आहेत. व्हिडिओमध्ये जेनेलिया मुलाला विसरली असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे ती मुलाला विचारते की, ‘तू कौन है?’

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

- Advertisement -

जेनेलियाच्या या व्हायरल व्हिडिओला ४ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून १ हजारहून अधिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी जेनेलियाने जीममधील कॉमेडी व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये मिलियनसमध्ये व्ह्यूज मिळाले होते. जेनेलियाचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले तर तिच्या प्रत्येक व्हिडिओ आणि रिल्सला मिलियनमध्ये व्हूयज मिळाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान रितेश देशमुखसोबत ‘तुझे मेरी कसम है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी जेनेलिया जरी काही चित्रपटात दिसली असली तरी तिचे काही चित्रपट हीट ठरले आहेत. ‘जाने तू या जाने ना’ हा चित्रपट जेनेलियाच्या बेस्ट लिस्टमधील एक चित्रपट आहे. ‘फोर्स २’ या चित्रपटात जेनेलिया जॉन अब्राहमसोबत शेवटची दिसली होती. त्यानंतर जेनेलिया जास्त चित्रपटात दिसली नाही.


हेही वाचा – Video: भीक मागणाऱ्या मुलीचे फर्राटेदार इंग्रजी; अनुपम खेर झाले इम्प्रेस, शिक्षणाची घेतली जबाबदारी


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -