घरमनोरंजन'नदीया के पार'मधील गुंजा आता दिसते 'अशी', चंदनही ओळखणार नाही

‘नदीया के पार’मधील गुंजा आता दिसते ‘अशी’, चंदनही ओळखणार नाही

Subscribe

1982 मध्ये प्रदर्शित झालेला ‘नदिया के पार’ चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील गुंजा आणि चंदनच्या जोडीला प्रेक्षकांची लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात गुंजा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री ​​साधना सिंह आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आता या चित्रपटाला जवळपास 41 वर्ष पूर्ण झाली आहेत.

अभिनेत्री साधना सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या आपल्या सोशल मीडियावरुन त्यांचे अनेक नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.

- Advertisement -

नुकतेच त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्यांनी पांढऱ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. या फोटोंसोबत त्यांनी खाली कॅप्शनमध्ये त्या बनारसला आल्याचं लिहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर साधना यांचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यांचे चाहते या फोटोंवर अनेक कमेंट्स करत आहेत. दरम्यान, यापूर्वी साधना यांना ‘गिल्टी माइंड्स’ या वेब सीरिजमध्ये दिसल्या होत्या.

 


हेही वाचा :

रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’चा सिक्वेल 3 वर्षांनंतर होणार प्रदर्शित; दिग्दर्शकाची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -