घरमहाराष्ट्रनागपूर"उद्धव ठाकरे घरकोंबडा, यापुढे देवेंद्र फडणवीसांबद्दल अपशब्द वापरले तर रस्त्यावर फिरणे मुश्किल...

“उद्धव ठाकरे घरकोंबडा, यापुढे देवेंद्र फडणवीसांबद्दल अपशब्द वापरले तर रस्त्यावर फिरणे मुश्किल करु”

Subscribe

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल यापुढे अपशब्द वापरले तर त्यांना घराबाहेर पडणे मुश्किल करुन टाकू असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भीती वाटत आहे. त्यामुळेच ते देवेंद्र फडणवीसांबद्दल वाईट बोलत आहेत. उद्धव ठाकरे यांनी यापुढे जर अशी भाषा वापरली तर त्यांना मातोश्रीबाहेर पडणे मुश्किल केले जाईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे राजकीय आत्महत्याकरण्यासाठी निघाले… 

- Advertisement -

बावचाळलेला, निराश व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी जसा बाहेर पडतो, तशी स्थिती उद्धव ठाकरे यांची झाली आहे. असंस्कृत भाषा वापरून उद्धव ठाकरे हे राजकीय आत्महत्या करण्यासाठी निघाले आहेत, असा टोला लगावत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, यापुढेही त्यांची भाषा अशीच राहीली तर उद्धव ठाकरे जिथे जातील तिथे भाजप कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरतील असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे गृहमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांची भीती विरोधकांना वाटत आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या स्वभावात थोडा बदल केला आणि विरोधकांचे घोटाळ्याचे घबाड काढायला सुरुवात केली तर, उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात राहाणे मुश्किल होईल, असा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
ठाण्यातील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला पदाधिकाऱ्यावर शिंदे गटाकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी आज (मंगळवार) रोशनी शिंदेंची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा उपमुख्यमंत्री मिळाला. नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. राज्यात काही झाले तरी हलायला तयार नाही. असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लाळघोटे करणारा उपमुख्यमंत्री म्हटल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष संतप्त झाले आहेत. त्यांनी ठाकरेंना घरकोंबडा म्हणत, यापुढे अशी भाषा वापरली तर मातोश्रीतून बाहेर पडणे मुश्किल केले जाईल, असा इशारा दिला आहे.

देवेंद्र फडणवीस हे संस्कारी व्यक्ती आहेत. ते कधीही आपल्या भाषेचा स्तर घसरू देत नाहीत आणि सूडबुद्धीने वागत देखील नाहीत, असे सांगत बावनकुळे म्हणाले, ‘मी अनेक वेळा त्यांना विनंती केली की तुम्ही तुमच्या स्वभावात बदल करा. पण देवेंद्र फडणवीस त्यांच्या स्वभावात बदल करत नाहीत. कधीही त्यांनी त्यांचे संस्कार सोडले नाही. त्यांच्याकडे शिवसेनेच्या नेत्यांचे एवढे घबाड आहे, की त्यांनी आकसबुद्धीने कारवाया करायला सुरुवात केली तर उद्धव ठाकरेंना घरातून बाहेर पडणे अवघड होऊन जाईल.’

उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांबद्दल वापरण्यात आलेल्या अपशब्दांबद्दल भाजप आज कोणतेही आंदोलन करणार नाही, पण ठाकरेंना हा शेवटचा इशारा आहे. यानंतर जर त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल अशी भाषा वापरली तर त्यांना घरकोंबडा बनूनच राहावे लागेल. असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वाईट वाटतं, पण मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ज्या पध्दतीने मानसन्मान दिला, त्यांना सांभाळलं. भावापेक्षा देखील जास्त प्रेम उद्धव ठाकरेंना दिलं. एखादवेळी भाजपचे कार्यकर्त्यांचं काम बाजूला केलं, पण उद्धव ठाकरेंनी सांगीतलेली एक-एक गोष्ट त्यांनी पूर्ण केली आणि हा घरकोंबडा, बेईमान.. देवेंद्रजीना बेईमान म्हणतोय असे चंद्रशेअर बावनकुळे म्हणाले.

ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हे कर्तव्य शून्य मुख्यमंत्री आहे. घरकोंबडा बनून त्यांनी काम केले आहे. तुमची सत्ता गेली आहे. धनुष्यबाण गेला आहे. आता तुम्हाला रस्त्यावर चालणंही मुश्किल करावं लागेल. देवेंद्र फडणवीसांवर खालच्या शब्दात टीका भाजप कदापी सहन करणार नाही. आजच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा अशी भाषा वापरली तर उद्धव ठाकरे यांना घरकोंबडा बनूनच राहावे लागेल.’

उद्धव ठाकरे हे विश्वासघातकी असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हा बोगस माणूस आहे. उद्धव ठाकरे हे विश्वासघातकी आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांचा एकही शब्द खाली पडू दिलेला नाही, ते आज फडणवीसांना विश्वासघातकी म्हणत आहेत. असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

आज पहिल्यांदा ते बोलले आहेत. त्यामुळे आम्ही कोणतेही आंदोलन करणार नाही. पण यानंतर पुन्हा जर त्यांनी असे शब्दप्रयोग केले, आणि व्यक्तीगत आरोप केले तर मातोश्री समोर येऊन आंदोलन केले जाईल, अशा इशारा बावनकुळे यांनी शिवेसना आणि उद्धव ठाकरेंना दिला आहे.

एका प्रश्नाच्या उत्तरात बावनकुळे म्हणाले, ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर आम्ही कोणीच नाही. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब यांचे पुत्र आहे हे सोडल्यास त्यांच्यात बाळासाहेब ठाकरेंचा एकही गुण नाही. उद्धव ठाकरे हे प्रचंड विश्वासघातकी निघाले आहेत.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -