घरमनोरंजनराकेश रोशन यांना घशाचा कॅन्सर

राकेश रोशन यांना घशाचा कॅन्सर

Subscribe

प्रसिद्ध निर्माता - दिग्दर्शक राकेश रोशन यांना घशाचा कॅन्सर असल्याची माहिती ह्रतिक रोशननं दिली आहे. इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्याखाली भावनिक पोस्ट लिहत ह्रतिकनं याबाबतची माहिती दिली आहे.

प्रसिद्ध निर्माता – दिग्दर्शक राकेश रोशन यांना घशाचा कॅन्सर असल्याची माहिती ह्रतिक रोशननं दिली आहे. इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्याखाली भावनिक पोस्ट लिहत ह्रतिकनं याबाबतची माहिती दिली आहे. आठवड्यापूर्वी राकेश रोशन यांना घशाचा कॅन्सर असल्याचं निदान झालं असं ह्रतिकनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. जीममधील दोघांचा एक फोटो ह्रतिक  इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याखाली त्यानं ‘सकाळी मी वडिलांना एक फोटो काढण्यासाठी विचारलं. सर्जरीच्या दिवशीही ते जीमला येणं विसरणार नाहीत. याबद्दल मला खात्री होती. मी ओळखत असणाऱ्यांपैकी ते सर्वात कणखर व्यक्ती आहते. काही आठवड्यांपूर्वी त्यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. पण या लढ्याला ते जिद्दीनं सामोरं जात आहेत. त्यांच्यासारखा कुटुंबप्रमुख लाभला हे आमचं भाग्य आहे’. असं ह्रतिक त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -