घरमनोरंजन'मी पैशांसाठी लग्नात नाचत नाही', इशारा कुणाकडे?

‘मी पैशांसाठी लग्नात नाचत नाही’, इशारा कुणाकडे?

Subscribe

'पैशांसाठी एखाद्याच्या लग्नात किंवा डान्स शोमध्ये नाचणाऱ्यांपैकी मी नाही', असं वक्तव्य करत जॉनने बॉलीवूडच्या आघाडीच्या स्टार्सना टोला हाणला आहे.

बॉलीवूडचा हँडसम हंक जॉन अब्राहिम त्याच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मध्यंतरी हरयाणात गर्भवती बकरीवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी ‘देशातील महिला आणि जनावरं सुरक्षित नाहीत’, असं वक्तव्य जॉनने केलं होतं. ज्यामुळे जॉन बॉलीवूडपासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडेच चर्चेचा विषय ठरला होता. त्यापाठोपाठ आता जॉन अब्राहिमने एक नवीन पण वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘पैशांसाठी एखाद्याच्या लग्नात किंवा डान्स शोमध्ये नाचणाऱ्यांपैकी मी नाही’, असं वक्तव्य करत त्याने बॉलीवूडच्या आघाडीच्या स्टार्सना टोला हाणला आहे. यासोबतच जॉनने सर्वाधिक मानधन घेणाऱ्या काही अभिनेत्यांवरही टीका केली आहे. ‘सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सच्या यादीत झळकायची कलाकारांना काय हौस असे?’ असा सवाल जॉनने उपस्थित केला आहे. एका सच्चा अभिनेत्याने फक्त अभिनयावर आणि दर्जेदार चित्रपटांवरच फोकस करावा, लोकांनी लुबाडून सर्वाधिक मानधन मिळवणाऱ्यांच्या यादीत यायची धडपड करु नये, असा सणसणीत टोला जॉनने लगावला आहे.


वाचा : जामीन मिळताच सोडलं मौन, आलोकनाथ म्हणाले…

एका खासगी मुलाखतीत बोलतेवेळी जॉन म्हणाला, की ‘कुठल्याही अभिनेत्याची ओळख ही त्याच्या कामावरुन होते. पण इकडे वारंवार फ्लॉप चित्रपट देणारा हिरो देखील सलग ३ वर्ष, सर्वाधिक मानधन देणाऱ्यांच्या यादीत असतो ही बाब कुठेतरी खटकते.’ दरम्यान, जॉनने ही टीका अभिनेता सलमान खानवर केली असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. जे बॉलीवूड कलाकार लग्न समारंभ, अवॉर्ड शो तसंच अन्य खासगी कार्यक्रमांमध्ये डान्स परफॉर्मन्स करतात त्यांच्यावरही जॉनने निशाणा साधला आहे. ‘पैशांसाठी लग्नात, पार्टीत किंवा समारंभात जाऊन नाचणाऱ्या कलाकारांपैकी मी नाही’, असं स्पष्ट वक्तव्यही त्याने केलं. इशा अंबानीच्या लग्नात नाचणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर जॉनने ही टीका केल्याचं नेटिझिन्सचं म्हणणं आहे. जॉनच्या या सनसनी वक्तव्यांवर आता बॉलीवूडमधून काय प्रतिक्रीया उमटतात? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -