घरमनोरंजनMoushumi Chatterjee : 'मी जया बच्चनपेक्षा..,' मौसमी चॅटर्जी काय बोलून गेल्या?

Moushumi Chatterjee : ‘मी जया बच्चनपेक्षा..,’ मौसमी चॅटर्जी काय बोलून गेल्या?

Subscribe

बॉलिवूड कलाकार नेहमीच पापाराझींच्या कॅमेरात कैद होत असतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर पाहायला मिळतोय. मौसमी चॅटर्जी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमात काम केलं. नुकत्याच त्या एका कार्यक्रमात स्पॉट झाल्या. पापाराझींनी त्यांना फोटो काढण्यासाठी थांबवलं. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

मौसमी चॅटर्जी नुकत्याच एका कार्यक्रमात स्पॉट झाल्या. पापाराझींनी त्यांना फोटो काढण्यासाठी थांबवलं. यावेळी त्यांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. मौसमी चॅटर्जी आधी हसल्या आणि मग त्या थोड्यावेळात चिडल्या. मात्र, त्यांनी कसं तरी स्वत: ला सांभाळलं. नंतर फोटोग्राफर्ससमोर त्यांनी संयमाने पोझ दिले. यावेळी एकाने जेव्हा त्यांची तुलना अभिनेत्री जया बच्चन यांच्याशी केली, तेव्हा त्या लगेच पापाराझींकडे बघत म्हणाल्या, “मी जया बच्चनपेक्षा चांगली व्यक्ती आहे.” यानंतर त्या पापाराझींचं कौतुक करू लागतात. “जर तुम्ही लोक नसते तर आम्ही कुठे असतो. तुमच्याशिवाय आमचं काही अस्तित्व नाही”,असं म्हणत त्यांनी जया यांच्यावर पुन्हा अप्रत्यक्ष निशाणा साधला. जया बच्चन या नेहमीच त्यांच्या तापट स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या या वाक्यानंतर उपस्थित सगळेच हसू लागले.

- Advertisement -

 जया बच्चन यांना कॅमेरा आणि मीडिया यांच्याविषयी फार प्रेम नसल्याचं अनेकदा पहायला मिळालं. त्यांच्यासमोर जेव्हा कधी पापाराझी जातात, तेव्हा त्या नेहमीच चिडलेल्या दिसतात. अनेकदा त्यांना फोटोग्राफर्सवर ओरडतानाही पाहिलं गेलं आहे. त्यामुळे त्यांचा चिडका स्वभाव पाहून फोटोग्राफर्स आणि पापाराझी त्यांच्यापासून चार हात लांबच राहतात. फोटोग्राफर्सचा बेशिस्तपणा सहन न करता त्यांना थेट सुनावणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये जया बच्चन यांचे नाव घ्यावे लागेल.

काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये पापाराझ्झी आणि त्यांचे वागणे यावरुन प्रतिक्रिया दिली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, पापाराझ्झी हे बऱ्याचदा त्यांची पातळी ओलांडतात. त्याचा सेलिब्रेटींना त्रास होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही.

- Advertisement -

जया बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्या दोघींचं पटायचं नाही. एका मुलाखतीत मौसमी चॅटर्जी यांनी सांगितलं की गुलजार यांच्या कोशिश चित्रपटात जया बच्चन यांनी रिप्लेस केलं. मौसमीनं सांगितलं की त्यांनी चित्रपटासाठी तीनपर्यंत शूटिंग केलं. मात्र, त्यांनी पाहिलं तर जया बच्चन यांची सेक्रेटरी सगकाळपासून रात्री पर्यंत रहायची आणि एक दिवस अचानक गुलजार यांनी मौसमी चॅटर्जी यांनी चित्रपटातून रिप्लेस केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -