घरमनोरंजनमी हुशार पालकांपैकी एक आहे- डॉ.मधू चोप्रा

मी हुशार पालकांपैकी एक आहे- डॉ.मधू चोप्रा

Subscribe

पालकत्वाचे महत्त्व समजावून सांगणारे व्यक्तिमत्व म्हणून डॉ.मधू चोप्रा यांची ओळख आहे. प्रियांका चोप्रा आणि सिद्धार्थ चोप्रा यांची आई डॉ.मधू चोप्रा यांनी सुजाण पालकत्वाचे महत्त्व समजावून सांगताना म्हटले आहे की मुलांना यशस्वी, त्यांच्यातील आत्मविश्वास आणि इतरांप्रती आदरभाव असलेली व्यक्ती म्हणून घडवण्यात पालकत्वाचा महत्त्वाचा वाटा असतो. ‘पेरेंटीग मेड इझी’ या कोटो समूहावर डॉ.मधू चोप्रा यांनी पालकत्वाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. कोटो हा एक सामाजिक समूह मंच असून हा मंच फक्त महिलांसाठीचा मंच आहे. आपली दोन्ही मुले  नम्र असण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या आजी आजोबांचे त्यांच्यावर असलेले संस्कार हे आहे असे डॉ.चोप्रा यांनी सांगितलं.

डॉ.चोप्रा यांनी त्यांच्या जडणघडणीबाबत बोलताना सांगितले की, आमच्या घरात शिस्तीचं वातावरण होतं मात्र शिक्षणाला खूप महत्त्व होतं. पालकांनी त्यांच्या मुलांचे संगोपन करत असताना हुशार भूमिका अंगीकारणं गरजेचं आहे. आपल्या बालपणातील जडणघडणीतून जे पालक त्यातील कोणत्या गोष्टी निवडाव्यात हे जाणतात ते पालक हुशार पालक असतात. असे डॉ.चोप्रा यांचे म्हणणे आहे. ही क्षमता ज्या पालकांमध्ये असते ते पालक त्यांच्या जडणघडणीमध्ये मिळालेली कोणती मूल्ये आपल्या मुलांना द्यायची आहे याबाबत सुजाणपणे विचार करतात. मी या हुशार पालकांपैकी एक आहे असं मला वाटतं. असं मधु चोप्रा म्हणाल्या.

- Advertisement -

Madhu Chopra confirms that Siddharth Chopra's wedding is called off |  Filmfare.com

नव्या गोष्टी आत्मसात करणे, चुका झाल्यास त्या का झाल्या? त्या होऊ नये यासाठी काय करावे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पराभवाच्या भीतीने खचून जाऊ नये हे माझ्या वडिलांनी शिकवलं होतं. त्यांनी मला ज्ञान प्राप्त करू दिलं आणि चुकांमधून शिकण्याची मोकळीकही दिली. डॉ.मधू चोप्रा यांनी म्हटले आहे की, “मी माझ्या दोन्ही मुलांना सांगितले आहे की तुम्ही माझ्या खांद्यावर उभे आहात याची जाणीव ठेवा आणि ताठ मानेने जगायला शिका. जर तुम्ही पडलात तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला सावरण्यासाठी मी खाली उभी आहे. पडण्याच्या भीतीने घाबरून जाऊ नका.”

- Advertisement -

डॉ. मधू चोप्रा या त्यांचे अनुभव आणि सल्ले, कोटोवर अन्य पालकांसाठी शेअर करत असतात. हे महिलांसाठी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठीचे एक सुरक्षित ठिकाण आहे. इथे महिला कोणताही आडपडदा न ठेवता आपल्या समस्या, मनातल्या भावना मांडू शकतात किंवा सल्लाही देऊ शकतात.


हेही वाचा :

Priyanka Chopra :जेव्हा प्रियांकाच्या घरी पडली होती रेड…अनेक वर्षांनी सत्य समोर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -