घरक्राइमCrime News: पती-पत्नी और वो! प्रेयसीसोबत पतीला रंगेहाथ पकडलं; संतापलेल्या पत्नीने दोघांना...

Crime News: पती-पत्नी और वो! प्रेयसीसोबत पतीला रंगेहाथ पकडलं; संतापलेल्या पत्नीने दोघांना चपलेनं हाणलं

Subscribe

सतना जिल्ह्यात पती-पत्नी आणि प्रेयसीचा हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

भोपाळ: सतना जिल्ह्यात पती-पत्नी आणि प्रेयसीचा हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. घटना पाटेरी परिसरातील आहे. पती आपल्या प्रेयसीला घरी घेऊन आला. याची खबर पत्नीला कळाली आणि ती थेट आपल्या नातेवाईक, पोलिसांसह घरी धडकली. पती आणि त्याच्या प्रेयसीला एकत्र बघून तिला राग अनावर झाला अन् तिनं पती तसंच त्याच्या प्रेयसीला चपलेनं बेदम हाणलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Crime News Husband and Wife Aur Wo Husband caught red handed with girlfriend The enraged wife hit both of them with a shoe)

नेमंक प्रकरण काय?

सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या पाटेरी परिसरात पती-पत्नी आणि प्रेयसीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा झाला. हायव्होल्टेज ड्रामा दरम्यान पोलीस कर्मचारी उपस्थित होते. ही महिला तिचे आई-वडील आणि पोलिसांसह घरात पोहोचली आणि तिने पतीला चपलने मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान महिलेने पतीसोबत उपस्थित असलेल्या त्याच्या प्रेयसीलाही मारहाण केली.

- Advertisement -

मारहाण केलेल्या महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत. याचा तिला त्रास होत होता. त्यानंतर पत्नीने पतीची आणि त्याच्या प्रेयसीची बराच काळ रेकी करून पुरावे गोळा केले आणि शेवटी पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले. संतापलेल्या पत्नीने पतीला चपलेन मारहाण केलीच, पण प्रेयसीलाही बेदम मारलं. मारहाणीचा व्हिडिओ पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी बनवला होता, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या घटनेवेळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी उशिरा का होईना हस्तक्षेप केला. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास करून, कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

पत्नीचं म्हणणं काय?

मी गेल्या तीन वर्षांपासून माहेरी राहत आहे. माझा नवरा मला न्यायला आला नाही. मी स्वत: हून सासरी परत आले. तर तो मला परत का आलीस असा सतत प्रश्न विचारत होता. तसंच पुन्हा माहेरी जाण्यास सांगत होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत माझ्याशी भांडत राहायचा. मग मी एक दिवस रात्री त्याला फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं. मला संशय आला आणि मी तपास सुरू केला.

शोध घेतल्यानंतर मला त्याचं अफेअर असल्याचं समजलं. म्हणूनच तो घटस्फोटासाठी माझ्यावर दबाव टाकत होता. शिवीगाळ करत होता. आम्ही आधी त्याच्याविरोधात पुरावे गोळा केला. त्यानंतर मी नवरा आणि त्याच्या प्रेयसीला सतनामध्ये रंगेहाथ पकडलं. अखेर पोलिसांच्या मदतीने दोघांनाही पडकण्यात यश आलं, अशी माहिती महिलेने दिली आहे.

(हेही वाचा: Maharashtra Politics : 84 वर्षांच्या म्हाताऱ्याला संपवण्यासाठी…, आव्हाडांकडून संताप व्यक्त )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -