घरमनोरंजनइंडस्ट्रीमधील ग्रुपीजमचा फटका मलाही बसला - श्रृती मराठे

इंडस्ट्रीमधील ग्रुपीजमचा फटका मलाही बसला – श्रृती मराठे

Subscribe

इंडस्ट्रीच्या राजकारणाचा फटका मलाही बसला आहे, असे अभिनेत्री श्रृती मराठे म्हणाल्या आहेत.

‘सगळ्या क्षेत्राप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीतही राजकारण आहे. इंडस्ट्रीमध्येही ग्रुपीजम आहे. मी कुठल्याच ग्रृपचा भाग नाही. इंडस्ट्रीच्या राजकारणाचा फटका मलाही बसला आहे आणि अजूनही बसत आहे’, असे मत अभिनेत्री श्रृती मराठे यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ‘सांस्कृतिक कट्टा’अंतर्गत आयोजित केलेल्या वार्तालापाच्या कार्यक्रमात श्रृती मराठे यांनी अभिनय क्षेत्रातील प्रवास आणि या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहाबद्दल त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आणि सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे यावेळी उपस्थित होते.

‘मी कुठल्याही ग्रुपचा भाग नाही’

‘सगळ्या क्षेत्राप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीतही राजकारण आहे. मी कुठल्याही ग्रुपचा भाग नाही. त्याचा फटका मला बसला आहे आणि अजूनही बसत आहे. आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे. आपल्याला आपले विचार मांडू दिले जात नाहीत’, असे श्रृती मराठे म्हणाल्या. त्याचबरोबर ‘सध्या कलाकारांना सोशल मिडीयामध्ये ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण, मी जास्त ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही’, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

वेब सिरीजमध्ये अभिनयाला वाव

‘वेब सिरीज या नव्या माध्यमात प्रत्येकाला काम करावेसे वाटते. जिथे दिसण्यापेक्षा तुमच्या अभिनयाकडे सगळ्यांचे लक्ष असते. कलकारांना वेब सिरीजमुळे एक चांगला प्लॅटफार्म उपलब्ध झाला आहे. वेब सिरीजमध्ये तुमच्या अभिनयाला वाव असतो’, असे मराठे म्हणाल्या.

नाटक लोकांपर्यंत पोहोचत नाही

‘हल्ली नाटक ज्या पद्धतीने पोचायला हवे त्या पद्धतीने पोचत नाही. संहिता आणि निर्मिती चांगली असूनही प्रेक्षक त्याकडे वळत नाहीत हे वास्तव आहे. काही वेळेला कमी प्रयोग करून त्या नाटकांचे प्रयोग थांबवावे लागतात. संगीत नाटकांबद्दल मला अद्याप कोणी विचारले नाही. मला मालिका, नाटक, वेब सिरीज आणि चित्रतट या तिन्ही माध्यमात काम करायला आवडते. कारण त्यात अभिनयासाठी वाव मिळतो’, असेही मराठे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -