घरमहाराष्ट्रआपसातील भांडणामुळे दोघांचंही नुकसान; सरसंघचालकांनी व्यक्त केली खंत

आपसातील भांडणामुळे दोघांचंही नुकसान; सरसंघचालकांनी व्यक्त केली खंत

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजप-सेना आपसात भांडल्याने दोघांचेही नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा व शिवसेना या दोन्ही मित्र पक्षात मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समान वाटा या मुद्यांवरून एकमत न झाल्याने, जनतेने कौल दिल्यानंतरही राज्यात महायुतीला सत्तास्थापन करता आलेली नाही. परिणामी सध्या राज्यात राष्ट्रपती शासन लागू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपसात भांडल्याने दोघांचेही नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच याबाबत आपले नुकसान होत असल्याचे माहिती असुनही काहीजण भांडतात, असेही त्यांनी नमूद केले आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

- Advertisement -

काय म्हणाले सरसंघचालक

स्वार्थ अत्यंत वाईट गोष्ट आहे, हे सर्वांना माहित आहे. मात्र, आपल्या स्वार्थाला खूप कमीजण सोडतात. देशांचे उदाहरण घ्या किंवा व्यक्तींचे. माणसाला हे देखील माहिती आहे की निसर्गाला नष्ट केल्याने आपलाही विनाश होणार आहे. मात्र, निसर्गाला नष्ट करण्याचे कार्य अद्यापही थांबलेले नाही. आपसात भांडण केल्याने दोघांचेही नुकसान होते. तरीदेखील आपसातील भांडणं अद्यापही बंद झालेली नाहीत.

हेही वाचा –

‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचे ११ जणांसोबत होते अफेअर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -