घरमनोरंजनअवघ्या दोन दिवसांत 'आदिपुरुष'ने केला 240 कोटींचा टप्पा पार

अवघ्या दोन दिवसांत ‘आदिपुरुष’ने केला 240 कोटींचा टप्पा पार

Subscribe

सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान आणि कृती सेनन यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस उलटले आहेत. या चित्रपटाने दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. मात्र, रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाला अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. नुकतेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, या दोन दिवसांत चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवरून एकूण 240 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘आदिपुरुष’ने कमावले 240 कोटी

नुकतेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, ‘आदिपुरुष जगभरातील प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्यात यशस्वी झाला. सर्व अपेक्षा ओलांडत या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 140 कोटींची कमाई केली. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 100 कोटी कमावले. त्यामुळे चित्रपटाने अवघ्या 2 दिवसांत 240 कोटींचा व्यवसाय केला. भगवान रामाचा जयजयकार.’

- Advertisement -

हिंदी बॉक्स ऑफिसवर कमावले ‘इतके’ कोटी

हिंदी बॉक्स ऑफिसवर आदिपुरुष चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे एकूण आकडे अद्याप समोर आलेले नाहीत. चित्रपटाने पहिल्याच दिवशी हिंदी चित्रपटगृहांतून जवळपास 37 कोटींची कमाई केली होती.

चित्रपटातील संवाद बदलले जाणार

‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये असलेले संवाद हे रामायण काळातील वाटत नसून छपरी वाटत होते. त्याबद्दल उसळलेला जनशोभ बघून आदिपुरुषचे निर्माता निर्देशक यांनी आदिपुरुषचे डायलॉग बदलण्याचे विचार जाहीर केले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आदिपुरुषचे संवाद हे सौम्य आणि सोज्वळ भाषेमध्ये ऐकायला येणार आहेत. लेखक मनोज मुंतशिर शुक्ला यांनी आदिपुरुषचे संवाद लिहिले असून, त्या संवादावरून बराच गदारोळ उठला होता.

- Advertisement -

हेही वाचा :

करण देओलची वधू द्रिशा आचार्यची जबरदस्त एन्ट्री; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -