घरमनोरंजनजयडी निघाली 'मुंबई'ला

जयडी निघाली ‘मुंबई’ला

Subscribe

जयडी मुंबईत येणार असून ती मुंबईला का येत आहे याचे गुपित गुलदस्त्यात आहे.

झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील जयडी तुम्हाला आठवतेय का? या मालिकेमध्ये जयडीने निगेटीव्ह भूमिका केली असली तरी देखील ही जयडी म्हणजे किरण ढाणे हीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. जयडी आणि तीच्या आईची जोडी प्रेक्षकांनू चांगलीच डोक्यावरही घेतली. मात्र, मानधानावरून झालेल्या वादामुळे या दोघींनाही मालिका सोडावी लागली होती. या दोघींच्या जाण्यामुळे मात्र यांचे फॅन्स त्यांच्यावर चांगलेच नाराज झाले. पण जयडीच्या फॅन्ससाठी एक खूशबर आहे. लवकरच किरण एका नवीन मालिकेत किंवा चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.

इन्स्टावर शेअर केले व्हिडिओ

गेले काही दिवस गायब असणाऱ्या किरणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती लवकरच मुंबईत येणार असल्याचं म्हणाली आहे. पण ती मुंबईत नेमकं कशासाठी येणार आहे. हे मात्र सांगितलेलं नाही. तिने आपल्या फॅन्सलाच आपण मुंबईत का येत आहोत हे ओळखायला सांगितलं आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना Big Update Coming Up… तयार रहा एका मोठ्या बातमीसाठी….Stay Tuned… Keep Loving. असा मेसेज देखील लिहीला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. कोणी चित्रपटासाठी, मालिकेसाठी तर कोणी डान्स शो साठी किरण मुंबईत येणार असल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

त्यानंतर किरणने आणखी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकला आहे. त्या ती म्हणतेय ‘मी मुंबईत जाण्यासाठी बॅग पॅक केली आहे. पण मला भिती वाटतेय. तर मला तुम्हा प्रेक्षकांची हेल्प हवी आहे. तुम्ही मुंबईत रहात असाल तर मुंबईचे अनुभव शेअर करा. कारण मी पहिल्यांदा मुंबईत रहायला येत आहे.

View this post on Instagram

Excited bt nervous….

A post shared by Kiran Dhane किरण ढाणे (@kiran_dhane) on

- Advertisement -

जयडीचे गुपित गुलदस्त्यात

किरणने शेअर केलेल्या या दोन व्हिडिओनंतर नेमकं किरण कोणत्या कामासाठी मुंबईत येत आहे हे कळलं नसलं तरी ती लवकरच एखाद्या मालिकेत दिसण्याची शक्यता आहे. अद्याप ही मालिका कोणती? त्यात तिची काय भूमिका असेल याबाबत माहिती कळू शकली नाही.


वाचा – ‘लागीरं झालं जी’ मालिकेत शहिद जवानांना मानवंदना!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -