घरमनोरंजन'ही' सेलिब्रिटी चाईल्ड पहिल्यांदाच दिसली रेड कार्पेटवर

‘ही’ सेलिब्रिटी चाईल्ड पहिल्यांदाच दिसली रेड कार्पेटवर

Subscribe

सेलिब्रिटींच्या मुलांनी सोशल इव्हेंटसना हजेरी लावणे आता काही नवे नाही. अॅवार्ड फंक्शन, पार्टीज, ओपनिगं सेरेमनीमध्ये आपल्या मुलांना घेऊन सेलिब्रिटीज हमखास दिसतात. करीनाचा कपूरचा तैमूर या सेलिब्ज चाईल्डमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, पण आता बॉलीवूडच्या आणखी एका सेलिब्रिटीची मुलगी पहिल्यांदाच रेड कार्पेटवर दिसली आहे.

ही सेलिब चाईल्ड दुसरी तिसरी कोणी नसून न्यासा आहे. काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासाने पहिल्यांदाच रेडकार्पेटवर दिसली. स्वत: काजोलनेच तिच्या ऑफिशिअल इनस्टाग्राम अकाऊंटवरुन तिचा न्यासासोबतचा फोटो शेअर केला आहे आणि ‘माझ्या लाडक्या लेकीसोबत पहिल्यांदाच रेड कार्पेटवर’ अशी कॅप्शनही लिहिली आहे.

- Advertisement -

सोशल प्रेझेंस कमीच
इतर सेलिब्रिटी चाईल्डप्रमाणे न्यासा सोशल इव्हेंटसना फारशी दिसत नाही. १५ वर्षीय न्याास धीरुभाई अंबानी शाळेत शिकत असून सध्या तरी बॉलीवूड पदार्पणाचे तिचे काहीच प्लॅन नसल्याचे देखील कळत आहे.

‘एला’ मध्ये दिसणार काजोल
‘बेटा, कागडो’ या गुजराती नाटकावर आधारीत ‘एला’ या हिंदी सिनेमात काजोल प्रमुख भूमिका साकारली आहे. या सिनेमाचे लेखन मितेश शहा आणि आनंद गांधी यांचे असून प्रदिप सरकारने सिनेमाचे दिग्दर्शन केले असून यात काजोल महत्वाकांक्षी गायक आणि सिंगल मॉमच्या कॅरेक्टरमध्ये दिसणार आहे. हा सिनेमा १८ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

- Advertisement -

सेलिब्रिटी चाईल्डची क्रेझ
सेलिब्रिटींपेक्षा सध्या सगळ्यांना सेलिब्रिटी चाईल्डना बघायला आवडतं. यात पहिल्या क्रमांकावर करीना आणि सैफचा तैमूर आहे. त्याखालोखाल शाहिद आणि मीरा कपूरची मिशा, शाहरुखचा इब्राहिम, ऐश्वर्याची आराध्या या सारखे अनेक सेलिब्ज चाईल्ड सोशल इव्हेंटसना कॅमेऱ्यात टिपले जातात.

 

My little girl with me on a red carpet for the first time …..❤❤❤

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -