घरटेक-वेकअवघ्या एक हजारात येणाऱ्या जबरदस्त पॉवरबँक

अवघ्या एक हजारात येणाऱ्या जबरदस्त पॉवरबँक

Subscribe

मोबाईल हा आज आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपण घराबाहेर पडताना नेहमी मोबाईल सोबत घेतो, मगच घराबाहेर पडतो. परंतु, बाहेर गेल्यावर मोबाईलची बॅटरी संपली तर? या प्रश्नांवर टेक्नॉलॉजीने उत्तर शोधून ठेवलय. ते उत्तर म्हणजे पॉवरबॅक. बॅटरीच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या पावरबँक बाजारात उपलब्ध आहेत. परंतू आपल्या मोबाइलसाठी सूट होणारी पॉवरबँक घेणे गरजेचे आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या पॉवरबँक अगदी तुमच्या बजेटमध्ये कोणत्या आहेत, याबद्दलची माहिती इथे देत आहोत. २० हजार एमएएचची बॅटरी बॅकअप असलेल्या आणि ९९९ रुपयांपर्यंत असलेल्या या ८ पावरबँक.

१. ड्यूस पॉवर बडी

- Advertisement -

या पावरबँकचे वजन ३९९ ग्र‌ॅम असून याची किंमत ९९९ रुपये इतकी आहे. या पॉवरबँकच्या सर्कीटमध्ये चार्जींग संरक्षणाबरोबरच ओव्हरलोड संरक्षण देखील आहे. या पॉवरबँकला ३ युएसबी चार्जींग पोर्ट आहेत. या पावरबँकचे 5V/1A, 5V/2A आणि 5V/2A पॉवर आऊटपूट आहेत.

२ फिप्ट्रिक
या पावरबॅकचे वजन २८१ ग्रॅम असून याची किंमत ९९९ रुपये इतकी आहे. त्याचबरोबर या पावरबँकमध्ये एलईडी लाइटचीही सुविधा आहे. या पावरबँकचे 3A, 2A आणि 1A आऊटपूट आहेत.

- Advertisement -

३. ओकॅमो
ओव्हर-चार्ज, ओव्हर-डिस्चार्ज, ओव्हर-करंट, ओव्हर-व्होल्टेज आणि शॉर्ट सर्कीट यांपासून संरक्षण करण्याची ताकद या पॉवरबँकमध्ये आहे. या पॉवरबँकला २ युएसबी चार्जींग पोर्ट आहेत.

४. एमएसई
२ युएसबी चार्जींग पोर्टसहीत 5V 2.1A, 5V 1.0A चार्जींग रेट्स आहेत

५. स्पेसवॉक
या पावरबँकचे वजन ३४० ग्रॅम आहे. त्याचबरोबर या पावरबँकला दोन चार्जींग पोर्ट आहेत.

६. कॉलमेट
या पावरबँकचे किंमत ७९९ रुपये असून २०,००० एमएएच इतकी त्याची क्षमता आहे. या पॉवरबँकची ६ महिन्याची वॉरंटी आहे. तसेच याचे आऊटपूट रेटिंग DC 5V 1A आहे

७. रॉक ITP502
हा पॉवरबँक ९९९ रुपयांमध्ये आहे. या पॉवरबँकला २ युएसबी पोर्ट असून त्याचे चार्जींग रेटिंग 5V 2.1A आणि 5V 1.0A आहे.

८. वर्क वॅल्यू
या पावरबँकची २०, ८०० एमएएच इतकी क्षमता आहे. हा पावरबँकसुद्धा ८९९ रुपयांत आहे. या पॉवरबँकमध्ये एकच चार्जींग असून वजन ४४९ ग्रॅम आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -