घरट्रेंडिंग...तर मी माझा पुरस्कार परत देईन, कंगना रनौतचा टिकाकारांवर पलटवार

…तर मी माझा पुरस्कार परत देईन, कंगना रनौतचा टिकाकारांवर पलटवार

Subscribe

 

बॉलिवूडची पंगा गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौत दिवसेंदिवस आपल्या बेताल वक्तव्यामुळे ट्रेंडींगमध्ये राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नुकतचं कंगनाने केलेल्या एका विधानामुळे पुन्हा वाद उफाळून आला आहे. कंगना रणौतला काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कार ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले होते. त्यानिमित्ताने कंगनाला टाईम्सनाऊच्या ‘सिलिब्रेटिंग इंडिया @७५’ मध्ये गेस्टस्पिकर म्हणून बोलवण्यात आले होते. यादरम्यान कंगनाने अनेक वादग्रस्त विधान केली. तिने १९४७ मध्ये भारताला मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती आणि खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले असे विधान केले. त्यानंतर कंगनाविरोधात देशभरात प्रतिक्रिया उमटू लागल्या. ट्वीटवर #कंगना_पद्मश्री_वापस_करो असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. याच अनुषंगाने आज शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून कंगनाला सणसणीत टोला लगावला आहे. सर्व स्तरावरुन आता कंगनाच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला जात असून आता कंगनाने यासर्व टिकेवर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

…तर मी माझा पुरस्कार परत देईन

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर स्पष्टीकरण दिले आहे. या मुलाखतीत सर्वकाही स्पष्टपणे सांगण्यात आले होते की पहिले संघटित युद्ध 1857 मध्ये स्वातंत्र्यासाठी लढले गेले होते. मला 1857 च्या लढ्याची  माहिती आहे पण 1947 मध्ये कोणती लढाई झाली याबाबत मला काहीच माहिती नाहीये. जर कोणी मला या लढ्याची संपूर्ण माहिती सांगितली तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करून सर्वांची माफी मागेल… कृपया मला मदत करा.’

कंगनाने केला सवाल

तसेच कंगना पुढे म्हणाली,’राणी लक्ष्मीबाई सारख्या हुतात्म्यावर आधारीत फिचर फिल्ममध्ये मी काम केले आहे. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यावर बरेच संशोधन केलं आहे. राष्ट्रवादाबरोबरच दक्षिणपंथ विचारसरणीचाही उदय झाला, पण तो अचानक संपुष्टात आला? आणि गांधींनी भगतसिंगला का मरू दिले… सुभाषचंद्र बोस यांची हत्या का झाली आणि त्यांना गांधीजींचा पाठिंबा कधीच मिळाला नाही. शेवटी, आपला भारत देश एका इंग्रजाच्या हस्ते का विभागला गेला? भारतीय नागरीक स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याऐवजी एकमेकांना मारत होते. मला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.यासाठी मला मदत करा.

- Advertisement -

मी केलेल्या वक्तव्याचे परिणाम भोगण्यास तयार 

कंगनाने म्हणाली की मी केलेल्या विधानाचे परिणाम भोगण्यास तयार आहे. ‘ 2014 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत  मी विशेषत: सांगितले की,1947 मध्ये आम्हाला दाखवण्यासाठी स्वातंत्र्य मिळालं असलं तरी भारताच्या चेतना आणि विवेकला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. एक मृत सभ्यता जिवंत झाली आणि तिने पंख पसरले आणि आता ती जोरात गर्जना करत आहे.

कंगनाने तिचे स्पष्टीकरण मांडताना पुन्हा एकदा ती कशा प्रकारे भाजपाच्या आहारी गेली आहे याचे उदाहरण दिले आहे. अशा आशयाच्या अनेक कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत. आता कंगनाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तिला कशा प्रकारे मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हे हि वाचा – Withdraw Padma Shri: कोणत्या कारणामुळे कंगानबेनचं डोकं बधीर झालं ते NCBचे वानखेडे शोधू शकतील; शिवसेनेचा सणसणीत टोला

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -