घरमनोरंजनKangana Ranaut : 'मी कधीही लग्नात...'कंगनाची 'ती' पोस्ट कोणासाठी?

Kangana Ranaut : ‘मी कधीही लग्नात…’कंगनाची ‘ती’ पोस्ट कोणासाठी?

Subscribe

अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगवरुन सध्या वेगळ्याच प्रकारची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. या प्री वेडिंग सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते. बॉलिवूडमधील जवळपास सर्वच स्टार हे पार्टीमध्ये उपस्थित होते. फक्त उपस्थितच नाही तर धमाकेदार असा डान्स करताना देखील बॅालिवूड स्टार दिसले. मात्र, या पार्टीत कुठेही कंगना राणावत ही दिसली नाही. यात आता कंगनाच्या पोस्टनं प्री वेडिंग आणि त्याला उपस्थिती लावणारे सेलिब्रेटी वरुन वाद सुरु झाला आहे.

कंगना राणावत हिने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बाॅलिवूड स्टारचा समाचार घेतलाय. आता कंगना राणावत हिची ही पोस्ट सोशल मीडियवर चांगलीच व्हायरल होताना दिसतंय. अंबानींच्या पार्टीत डान्स करणाऱ्या कलाकारांना चांगलेच खडेबोल सुनावताना कंगना राणावत ही दिसत आहे. विशेष म्हणजे यासोबतच तिने एक मुलाखती शेअर केलीये.

- Advertisement -

पोस्टसोबत कंगना राणावत हिने लता मंगेशकर यांची एक मुलाखत शेअर केलीये. या मुलाखतीमध्ये लता मंगेशकर यांनी म्हटले की, मला कोणी जरी पाच लाख डॉलर्स दिले तरी मी येणार नाही. या पोस्टमध्ये कंगना राणावत ही आपली आणि लता मंगेशकरची बरोबरी करताना दिसत आहे. कंगना म्हणते की, मला कोणीही करोडो रूपये दिले तरीही मी कोणाच्या कार्यक्रमात परफॉर्म नाही करणार.

- Advertisement -

 

कंगनाच्या इंस्टा स्टोरीचा स्क्रिन शॉट व्हायरल होतो आहे. त्यामध्ये तिनं स्वताची तुलना लता मंगेशकर यांच्यासोबत केली आहे. तिनं एका लेखाचा दाखला दिला आहे. ती म्हणते, मला पाच लाख डॉलर दिले तरी मी येणार नाही. मी खूप साऱ्या बिकट आर्थिक परिस्थितीला सामोरी गेली आहे. मात्र आता मी आणि लताजी आम्ही दोघेच असे सेलिब्रेटी आहोत ज्यांची सगळी गाणी लोकप्रिय झाली आहे.

Kangana News

कंगना राणावत म्हणते की, मी आयुष्यात खूप आर्थिक संकटातून गेले आहे. लताजी आणि मी असे दोनच व्यक्ती आहोत ज्यांची गाणी खूप हिट आहेत (फॅशन का जलवा, घनी बावली हो गई, लंडन ठुमकदा, साडी गली, विजय भवा) पण तरीही मी लग्नात कधीच नाचले नाही. कित्येकदा सुपरहिट आयटम साँग देखील मला ऑफर करण्यात आले होते. पण ते केले नाही.

मी कधीही कोणत्या पुरस्कार सोहळ्याला गेली नाही. पैसा आणि प्रसिद्धी याला नाही म्हणण्यासाठी तुमच्याकडे शुद्ध चारित्र्य आणि अभिमानाची गरज असते. युवा पिढीला एक गोष्ट समजण्याची गरज आहे की, सर्वात मोठं धन हे ईमानदारी आहे. कंगनानं भलेही त्या पोस्टमध्ये कुणाचं नाव घेतलं नाही. कंगनाच्या त्या पोस्टवरुन आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. ती नेमकं कुणाला बोलली आहे, तिचा बोलण्याचा रोख अंबानी यांच्या राधिका अन् अनंतच्या प्री वेडिंगमध्ये सहभागी झालेल्या बॉलीवूड कलाकारांसाठी तर नाही ना, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -