Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ‘चंद्रमुखी 2’मधील कंगनाचे भरतनाट्यम चर्चेत

‘चंद्रमुखी 2’मधील कंगनाचे भरतनाट्यम चर्चेत

Subscribe

बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौत नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या कंगना तिच्या ‘चंद्रमुखी 2’चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात कंगना मुख्य भूमिका साकारणार असून नुकत्याच काही तासांपूर्वी या चित्रपटातील पहिल्या गाण्याची झलक समोर आली आहे. या गाण्यामध्ये कंगना भरतनाट्यम करताना दिसत असून यामुळे अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.

‘चंद्रमुखी 2’मधून कंगना पुन्हा एकदा तमिळ चित्रपटात दिसणार आहे. मागील अनेक दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत होता. अशातच, या चित्रपटातील पहिलं गाणं ‘स्वागथांजलि’ची पहिली झलक शेअर करण्यात आली ज्यामध्ये कंगना भरतनाट्यम करताना दिसत आहे. यामध्ये कंगना गुलाबी रंगाच्या ट्रेडिशनल आउटफिटमध्ये दिसत असून यात ती कठीण आणि सुंदर डान्स स्टेप्स करताना दिसत आहे.

- Advertisement -

हे गाणं ऑस्कर विजेते संगीतकार एमएम कीरवानी यांनी संगीतबद्ध केले असून या गाण्यात कंगनाच्या डान्सची सर्वाधिक चर्चा होत आहे. अनेकांनी कंगनाच्या लूकचा आणि डान्सचं कौतुक केले आहे तर अनेकांना कंगनाचा डान्स आवडला नाही.

काय आहे चंद्रमुखीची गोष्ट

- Advertisement -

या चित्रपटाची कथा जोडप्याभोवती फिरते, जे अनेक वर्षांनंतर त्यांच्या बंद वडिलोपार्जित घरात राहायला येतात, जिथे त्यांच्यासोबत अनेक घटना घडू लागतात आणि त्यानंतर हे जोडपे डॉक्टरांना बोलवण्याचा निर्णय घेतात.

दरम्यान, हा चित्रपट गणेश चतुर्थीला 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पी वासू दिग्दर्शित, ‘चंद्रमुखी’ हा ब्लॉकबस्टर हिट तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट चंद्रमुखीचा सीक्वेल आहे. हा चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत होते.


हेही वाचा :

Photo : तुम्हारी कातील अदा… शिल्पा शेट्टीच्या फोटोवर चाहत्याची कमेंट

- Advertisment -