घरमनोरंजनतू माझा आज आणि उद्याही... करणने शेअर केली द्रिशासाठी खास पोस्ट

तू माझा आज आणि उद्याही… करणने शेअर केली द्रिशासाठी खास पोस्ट

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल आणि द्रिशा 18 जून (काल) रोजी विवाह बंधनात अडकले. करण देओल आणि द्रिशा आचार्य यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच, आता लग्नानंतरचे काही फोटो करणने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

करणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तीन वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोमध्ये द्रिशाने करणच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही हातात वरमाला घेऊन उभे आहेत. तर तिसऱ्या फोटोमध्ये द्रिशा लाजताना दिसत आहे. या तिन्ही फोटोंमध्ये करण, द्रिशा खूप आनंदी दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Deol (@imkarandeol)

- Advertisement -

या फोटोंसोबत करणने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “तू माझा आज आहेस आणि माझा उद्या आहेस. आमच्या आयुष्यातील एक सुंदर प्रवास सुरू झाला. आशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव केल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार.” करण देओलच्या या पोस्टवर त्याचे चाहते कमेंट करत आहेत. त्याचबरोबर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.

सनी देओलची पोस्ट चर्चेत

You are my today and all of my tomorrows": Karan Deol shares wedding pictures with Drisha Acharya - Articles

- Advertisement -

सनी देओल यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मुलाच्या लग्नानंतर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सनी देओलनेही करण आणि द्रिशाचे फोटो शेअर करत लिहिलंय की, “आज मला एक सुंदर मुलगी मिळाली आहे. तुम्ही सर्व माझ्या मुलांना आशीर्वाद द्या. देव त्यांचे भले करो!” करण देओल आणि द्रिशा आचार्य गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. द्रिषा आचार्य ही प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात आहे.


हेही वाचा :

‘द आर्चीज’साठी शाहरुखने दिल्या सुहाना खानला खास शुभेच्छा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -