घरमनोरंजन'द आर्चीज'साठी शाहरुखने दिल्या सुहाना खानला खास शुभेच्छा

‘द आर्चीज’साठी शाहरुखने दिल्या सुहाना खानला खास शुभेच्छा

Subscribe

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच ’द आर्चीज’ चित्रपटातून पदार्पण करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अशातच, आता शाहरुख खानने यावर प्रतिक्रिया देत आपल्या मुलीचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर रविवारी (आज) प्रदर्शित झाला आहे. फादर्स डे निमित्त शाहरुख खानने ट्विटरवर मुलगी सुहाना खानला तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी शुभेच्छा दिल्या.

अलीकडेच, ब्राझीलमधील साओ पाउलो येथे सुरू असलेल्या नेटफ्लिक्स टुडम इव्हेंटमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यावर शाहरुख खानने ट्विट केले आहे. त्याने लिहिले, “‘द आर्चीज’साठी माझ्या बाळाला फादर्स डेच्या दिवशी शुभेच्छा. तसेच इतर सर्व बाळांना आणि वाघाच्या बाळांना शुभेच्छा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

- Advertisement -

रविवारी नेटफ्लिक्सने झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या चित्रपटाचा टीझर रिलीज केला. या टीझरमध्ये 60 च्या दशकातील प्रेम, रोमान्स आणि ब्रेकअपची गोष्ट दाखवण्यात आली. टीझरची सुरुवात रिव्हरडेल या सुंदर हिल स्टेशनपासून होते. त्यानंतर सुहाना खान , खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा त्यांच्या 60 च्या दशकात नृत्य करताना दिसतात.

काय आहे चित्रपटाची कथा?

या चित्रपटातील कथा शालेय मौजमजेपासून सुरू होणारी कथा हळूहळू प्रेमात बदलते आणि नंतर ब्रेकअप होतो. चित्रपटात सुहाना ‘वेरोनिका’ची भूमिका साकारत आहे, खुशी ‘बेट्टी’ची भूमिका साकारत आहे आणि अगस्त्य ‘आर्ची’ची भूमिका साकारत आहे. यात तिघेही रेट्रो लूकमध्ये दिसत आहेत. या ट्रेलरवर प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘आदिपुरुष’ चित्रपटाविरोधात हिंदू महासभेकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -