घरमनोरंजनएक कप चहा, कॉफीसाठी किकूने मोजले तब्बल ७८ हजार!

एक कप चहा, कॉफीसाठी किकूने मोजले तब्बल ७८ हजार!

Subscribe

किकू सध्या बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिथल्या एका हॉटेलमध्ये त्याने एक कप कॅपुचिनो व एक कप चहा मागवला. त्यासाठी त्याला तब्बल ७८,६५० इतका बिल आलं.

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये प्रत्येक पदार्थाच्या अव्वाच्या सव्वा किंमती लावतात हे आपल्या सगळ्यांनाच माहितेय. अनेक कलाकारांनी या विरोधात आवाज उठवला आहे. नुकतेच अभिनेता राहूल बोसने दोन केळ्यांसाठी आकारलेल्या ४४० रुपयांच्या एका हॉटेलच्या बिलाचा फोटो सोशलमिडीयावर शेअर केला होता यावरून ही गोष्ट पुन्हा उजेडात आली. बिलचा हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर पंजाब सरकारने त्याची दखल घेतली. संबंधित हॉटेलला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. असाच फटका आणखी एका अभिनेत्याला बसला आहे. पण याची तो अजिबात तकरार करत नाहीये. या उलट तो खूप खूष आहे.

- Advertisement -

कॉमेडियन किकू शारदाने नुकताच एका हॉटेलमधील बिल सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फक्त एक कप चहा व कॉफीसाठी आकारलेला बिल पाहून तुमचेही डोळे विस्फारतील. पण किकू मात्र याबाबत अजिबात तक्रार करत नाहीये. किकूने यामागचं कारणंही सांगितलं आहे.

किकू सध्या बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिथल्या एका हॉटेलमध्ये त्याने एक कप कॅपुचिनो व एक कप चहा मागवला. त्यासाठी त्याला तब्बल ७८,६५० इतका बिल आलं. आता तुम्ही म्हणाल एक कप कॅपुचिनो आणि एक कप चहासाठी इतके पैसे किकूने का दिले अशा प्रश्न तुम्हाला पडेल. पण या मागचं कारण आहे की, इंडोनेशियातले चलन हे भारतीय रूपयापेक्षा कमी आहे. तिथले चलन हे इंडोनेशियन रुपया असल्याने त्याचे भारतीय चलनात रुपांतर केल्यास केवळ ४०० रुपये इतके बिल होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -