घरमुंबईबलात्कार पिडीतांसाठी केईएम हॉस्पिटलमध्ये 'वन स्टॉप सेंटर'!

बलात्कार पिडीतांसाठी केईएम हॉस्पिटलमध्ये ‘वन स्टॉप सेंटर’!

Subscribe

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरण आठवले की आजही अंगावर काटा येतो. अशी अनेक प्रकरणे महाराष्ट्रातही घडली आहेत. अशा पिडीतांच्या दु:खातून सावरण्यासाठी, त्यांना त्यांच्या आयुष्यात पुन्हा उभारी देण्यासाठी शिवाय एकाच ठिकाणी सर्वच प्रकारचे उपचार देण्यासाठी परळच्या केईएम या पालिकेच्या मुख्य हॉस्पिटलमध्ये महिला व बाल विकास विभाग आणि पालिकेतर्फे या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले असून बुधवारपासून या सेंटरला सुरूवात करण्यात आली आहे.

अत्याचार पिडीत महिलांना एकाच ठिकाणी वैद्यकीय उपचार, कायदेशीर मदत, समुपदेशन आणि निवारा मिळावा या हेतूने हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. निर्भया कायद्यानुसार अत्याचार पिडीत महिलांना एकाच ठिकाणी आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘वन स्टॉप सेंटर’ असणे गरजेचे आहे. केंद्राच्या महिला बाल विकास विभागाच्या सुचनांनुसार या सेंटरमधे येणाऱ्या महिलेला समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सल्ला, प्रसंगी निवारा मिळावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

हे सेंटर २४ तास सुरू राहणार असून यात पिडीतेचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन केले जाणार आहे. यासाठी डॉक्टरांची टीमही नेमण्यात आली आहे. यात पिडीतेच्या आरोग्यबाबत केले जाणारे सर्व उपचार केले जाणार आहेत.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार काम करत आहे. पिडीत महिलेला मदत मिळावी यासाठी देशभरात अशी सेंटर होत असुन मुंबईसारख्या शहरातही याची आवश्यकता आहे. महिलांवर अन्याय न होणे ही पुरुषांची तसेच समाजाचीदेखील जबाबदारी आहे.
– स्मृती इराणी, केंद्रीय महिला बाल विकास मंत्री

- Advertisement -

सेंटरला अरुणा शानभाग यांचे नाव देण्याची मागणी

राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, “या सेंटरला शुभेच्छा देणार नाही. कारण, या प्रकारच्या सेंटरचा उपयोग कमी व्हावा, असा समाज निर्माण करणे गरजेची आहे. केईएममध्ये जवळपास ४० वर्षे अरुणा शानभाग यांची सेवा केली आहे. त्यामुळे, या सेंटरला अरुणा शानभाग यांचे नाव द्यावे, अशी सुचना त्यांनी यावेळी महापालिकेला केली.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -