मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं आहे.
अंतरवाली सराटी येथे आज पुन्हा एकदा लाठीचार्ज होताना दिसत आहे , पण हा लाठीचार्ज खरा नसून मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर तयार होत असलेला “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटातील एक सीन आहे , हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे , हा चित्रपट गोवर्धन दोलताडे निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित असून मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत अभिनेता रोहन पाटील दिसणार आहे.
सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे “संघर्षयोद्धा” – मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख हे देखील उपस्थित होते. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे, सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद केले आहे.चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा :