घरमनोरंजन'बस्तर: द नक्सल स्टोरी' मधील 'वंदे वीरम' हे पहिले गाणे लॉन्च

‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ मधील ‘वंदे वीरम’ हे पहिले गाणे लॉन्च

Subscribe

‘बस्तर: द नक्सल स्टोरी’चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून लोकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून त्याला सर्व बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विपुल अमृतलाल शाह, सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा या दमदार त्रिकूटातून आलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

अलीकडेच एक मनोरंजक अपडेट समोर आले आहे, ज्यामध्ये ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’च्या निर्मात्यांनी सांगितले आहे की वंदे वीरम या चित्रपटाचे पहिले गाणे 11 मार्च 2024 रोजी रिलीज करण्याचा त्यांचा मानस आहे. सीआरपीएफ आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह मुंबईत लॉन्च इव्हेंटचे नियोजन करण्यात आले आहे. ‘बस्तर द नक्सल स्टोरी’ या चित्रपटासाठी ही गोष्ट मोठी आहे. कार्यक्रमात केवळ गाणे लॉन्च केले जाणार नाही, तर विपुल अमृतलाल शाह, सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा यांच्यासह उर्वरित कलाकार आणि क्रू एकत्र येऊन CRPF आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान करतील.

- Advertisement -

चित्रपट निर्मात्यांचा हा दृष्टीकोन प्रशंसनीय आहे, कारण ते नेहमीच्या लाँच इव्हेंटपासून दूर जात आहेत आणि सीआरपीएफ आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह गाणे लॉन्च करून काहीतरी नवीन करत आहेत. सैनिकांच्या शौर्याचा गौरव करणाऱ्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची थीम आणि मुद्द्याला अनुरूप असे गाणे लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. विपुल अमृतलाल शाह यांच्या सनशाइन पिक्चर्सद्वारे निर्मित आणि आशिन ए शाह द्वारे सह-निर्मित, ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ चे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे आणि यात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 15 मार्च 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा : ‘हिरामंडी’ मधील पहिले ‘सकल बन गाणे लॉन्च

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -