घरराजकारणRamdas Kadam : उद्धव ठाकरेंसारख्या गद्दाराला धडा शिकवण्याचं काम शिंदेंनी केलं -...

Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंसारख्या गद्दाराला धडा शिकवण्याचं काम शिंदेंनी केलं – रामदास कदम

Subscribe

दापोली : आज दापोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करणार आहेत. यावेळी मंचावर उपस्थित शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह भाजपावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंसारख्या गद्दाराला धडा शिकवण्याचं काम शिंदेंनी केलं, असं ते म्हणाले. (Eknath Shinde did the job of teaching a lesson to a traitor like Uddhav Thackeray Ramdas Kadam)

रामदास कदम म्हणाले की, दापोलीच्या नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत होता. परंतु उद्धव ठाकरे यांनी योगेश कदमला बाजूला तुमच्या राष्ट्रवादीच्या हातामध्ये नगरपरिषद दिली. पण त्यानंतर तुम्ही चांगला निर्णय घेतला. त्यामुळे मी तुमचे आभार मानतो. मी मगाशी बोललो ते भाजपाच्या बाबतीत नव्हते किंवा रवींद्र चव्हाण यांच्याबाबतीत बोललो नाही. परंतु इथे येऊन आजदेखील त्यावेळेला उद्धव ठाकरेंकडून संपवण्याचा प्रयत्न चालू होता आणि आज युती असताना इथल्या भाजपाकडून संपवण्याचा प्रयत्न चालू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Raj Thackeray : आपल्याला जातीपातीविरहित महाराष्ट्र घडवायचाय – राज ठाकरे

कोण तो रवींद्र चव्हाण? तो इथे 10-15 कोटींची काम घेतो. ठाण्याचे भाजपा आमदार केळकर, तो इथे येऊन स्थानिक आमदाराला सोबत घेऊन भुईमुग पिकवतो. गोव्याचे मुख्यमंत्री इथे दापोलीत येऊन शिवसेनेच्या लोकसभा जागेवर अधिकार जागवतात. हे काय चाललं आहे? असा प्रश्न उपस्थित करत एकनाथ शिंदे आपली संख्या कमी असतानाही भाजपाने तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं, पण जहाल शिवसेनेला 40 आमदार आणि 13 खासदार आणि 10 पक्ष घेऊन उद्धव ठाकरेंसारख्या गद्दाराला धडा शिकवण्याचं काम एकनाथ शिंदेंच करू शकतात. आणखी कोणाची ताकद नव्हती, असे म्हणत रामदास कदम यांनी भाजपावर निशाणा साधला.

- Advertisement -

रामदास कदम म्हणाले की, मागे फयान वादळ आलं होतं, तेव्हा कोकणातले सर्व मच्छिमार देशोधडीला लागले होते. शरद पवार यांच्यासारखे नेते इथे कोकणात 4 दिवस येऊन बसले होते. योगेश कदम यांनी रात्रं-दिवस काम केलं. तेव्हा अजित पवार यांनी त्यांना मदत केली. याठिकाणी प्रचंड मेहनत घेऊन मच्छिमारांची घर बांधली. पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे इथे बघायलाही आले नाहीत. मच्छिमारांचे अश्रू पुसण्याची ज्या उद्धव ठाकरेंकडे वेळ नव्हती, पण आता सगळीकडे सभा घेत आहेत. सगळीकडे पळत आहे. त्यांना पळायला शिंदेंनी लावलं आहे. मातोश्रीमधून त्यांना बाहेर काढलं आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयामध्ये आणि आता मोठ मोठ्या गप्पा हाणत आहेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली.

हेही वाचा – IND VS ENG : इंग्लंडच्या बॅझबॉलला भारताने चारली धूळ; मालिका 4-1 ने जिंकली

रामदास कदम यांचे ठाकरेंना आव्हान

उद्धव ठाकरे 14 तारखेला पुन्हा दापोलीत येत आहेत. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे, त्यांच्यात हिंमत असेल तर याच स्टेजवर इथेच सभा लावावी. मग बघावं किती स्थानिक लोक जमतात ते, फक्त भाड्याने आणू नये. मागे खेडला सभा लावली तेव्हा उभ्या महाराष्ट्रातून लोक आणली होती. जसं काय अफझलखान चालून येतो आहे, तसे ते चालून आले होते, अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -