घरमनोरंजनयापूर्वी फक्त वर्जिन अभिनेत्रींनाच काम मिळायचे, माहिमा चौधरीकडून बॉलिवूडची पोलखोल

यापूर्वी फक्त वर्जिन अभिनेत्रींनाच काम मिळायचे, माहिमा चौधरीकडून बॉलिवूडची पोलखोल

Subscribe

बॉलिवूडमधील झगमगती दुनिया अनेकांसाठी आकर्षणाचा विषय असतो. मात्र या लखलखणाऱ्या पडद्यामागे अशा काही घटना घडत असतात ज्यावर क्वचितच काही कलाकार बोलण्याचे धाडस करतात. अशातच बॉलिवूड जगतात काही वर्षांपूर्वी एक अभिनेत्री म्हणून वावरत असताना नेमकी काय स्थिती होती याचा खुलासा अभिनेत्री महिमा चौधरीने केली आहे.

१९९७ मध्ये ‘परदेस’ या चित्रपटातून महिमाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुभाष घाई यांच्य़ा दिग्दर्शित या चित्रपटात तिनं शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. मात्र महिमा गेल्या अनेक वर्षांपासून सिल्वर स्क्रीनपासून दूर आहे. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करत माहिमा चर्चेत असते. महिमा त्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांचे बॉलिवूडमधील करियर ज्या वेगाने प्रसिद्ध झोतात गेले त्या वेगानेच बॉलिवूडपासून लांब गेले.

- Advertisement -

नुकतचं महिमाने एका मुलाखतीत, भारतीय सिनेसृष्टीत पूर्वीच्या तुलनेत आत्ता किती बदल झालाय यावर भाष्य केलं. यावेळी माहिमा म्हणाली की, हल्ली अभिनेत्रींसाठी बरचं सकारात्मक वातावरण पाहायला मिळतेय. त्यांना अनेक चांगल्या भूमिका, चांगलं मानधन, चांगल्या जाहिराती मिळू लागल्यात. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आत्ताच्या अभिनेत्री चांगल्या आणि पावरफुल स्थितीत आहेत. त्यांची कारकिर्दही दिर्घकालीन टिकणार असल्याचे दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahimachaudhry (@mahimachaudhry1)

- Advertisement -

पूर्वी बॉलिवूडची परिस्थिती वेगळी…

बॉलिवूडमधील जुन्या आठवणींना उजाळा देत महिमा म्हणाली की, तुम्ही कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहात त्या क्षणापासून तुमची चर्चा होऊ लागते. मात्र पूर्वी तुमच्या रिलेशनशिपचा तुमच्या कामावर परिणाम व्हायचा. तेव्हा त्यांना फक्त वर्जिन, कोणालाही किस न केलेल्या अभिनेत्री लागत होत्या. त्यामुळे केवळ वर्जिन अभिनेत्रींनाच काम मिळायचे.

यापूर्वी तुम्ही कोणाला डेट केलंत तर चर्चा रंगायच्या. तुम्ही विवाहित असला तर विसरा…. कारण लग्नानंतर आमचे करियर जवळपास संपायचे… त्यात जर तुम्हाला मुलबाळं असतील तर करियर संपलेच म्हणून समजा… अशी परिस्थिती होती.

माहिमाने पुढे सांगितले की, लोक आत्ता वेगवेगळ्या तऱ्हेच्या भूमिकांसाठी महिलांना काम देत आहे. मात्र पूर्वी अनेक गोष्टींमुळे अभिनेत्रींना आपले वैयक्तिक आयुष्य गुलदस्त्यात ठेवावे लागायचे. फक्त अभिनेत्रींच नाही तर अभिनेते देखील आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर करायचे नाहीत. एखादा सिनेमा रिलीज झाल्यानंतर २ ते ३ वर्षांनी त्या अभिनेत्या किंवा अभिनेत्रीची माहिती समजायची.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahimachaudhry (@mahimachaudhry1)

मात्र आता रिलेशनशिप स्टेटस तुमचे बॉलिवूड करियर निश्चित करत नाही. आता मात्र दोनपैकी एक पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य अभिनेत्रींकडे आहे. आता गरोदरपणानंतरही, किंवा लग्न झाल्यानंतरही अभिनेत्रींना रोमँटीक भूमिका दिल्या जातात. त्यांचं खासगी आयुष्य सकारात्मकतेनं हाताळलं जातं, असं महिमा म्हणाली.

महिलमाच्या वैयक्तिक आयुष्यबद्दल सांगाय़चे झाल्यास, अभिनेत्रीने २००६ मध्ये बॉबी मुखर्जीसोबत लग्न केलं. मात्र २०१३ पासून दोघे विभक्त झालेय. मात्र लग्नानंतर महिमाला अरिना नावाची मुलगी आहे. मात्र माहिमा तिची सिंगल मदर म्हणून काळजी घेते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -