घरक्रीडाOwaisi on T20 : त्यांनी ९ जवान मारले, तरीही T20 खेळणार !...

Owaisi on T20 : त्यांनी ९ जवान मारले, तरीही T20 खेळणार ! ओवैसींचा ind vs pak सामन्याला विरोध

Subscribe

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा यंत्रणांना आणि परप्रांतीय लोकांना निशाणा केले आहे. या सगळ्या प्रकारावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी भारत आणि पाक दरम्यान होणाऱ्या सामन्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. एकीकडे जम्मू काश्मीरमध्ये ९ जवान शहीद झाले, दुसरीकडे २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकमध्ये सामना होणार आहे. या सामन्याला विरोध करताना ओवैसीने भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यावर टीका केली आहे. क्रिकेटच्या मुद्द्यसोबतच काश्मीरमधील सीजफायर आणि वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवरही ओवैसींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ओवैसी म्हणाले की, मला भारताच्या पंतप्रधानांना विचारायचे आहे की, जम्मू काश्मीरमध्ये एकीकडे शूरवीर अशा सैनिकांना मारले जात आहे. तर दुसरीकडे २४ ऑक्टोबरला भारत पाकिस्तानमध्ये टी २० सामना होणार आहे. मोदीजी तुम्हीच म्हणाला होता ना, की एकीकडे सैन्य मृत्यूमुखी पडते आहे आणि दुसरीकडे मनमोहन सिंह यांची सरकार बिरयानी खायला घालत आहे. आता सैन्याचे ९ सैनिक मारले गेले, तरीही तुम्ही टी २० खेळणार आहात. पाकिस्तान काश्मीरात भारतीयांचे जीव घेऊन आता विश्व चषकाच्या निमित्ताने टी २० खेळत आहे. दुसरीकडे बिहारच्या गरीब लोकांचा मृत्यू होत आहे. टार्गेट किलिंग होत आहे. काश्मिरातील इंटेलिजन्स काय करतोय ? खुलेआम पद्धतीने हत्यारे काश्मिरात येत आहे, असाही सवाल त्यांनी केला. पण अशा सगळ्या परिस्थितीतही दुसरीकडे मात्र तुम्ही क्रिकेट खेळणार आहात. पाकिस्तानातून दहशतवादीही काश्मीरात येत असल्याची टीका ओवैसींनी केली.

- Advertisement -

जम्मू काश्मीरमध्ये वाढतोय दहशतवाद

जम्मूच्या राजौरी आणि पुंछ येथे दहशतवाद्यांच्या विरोधात ११ ऑक्टोबरपासून ऑपरेशन सुरू आहे. या ऑपरेशनच्या निमित्ताने सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्याही पुंछला पाठविण्यात आल्या आहेत. या ऑपरेशनच्या निमित्ताने जेसीबीसह भारतीय सेनेच्या सैनिकांनीही बलिदान दिले आहे. दरम्यानच्या काळात भारतीय सेनेचे प्रमुख एम नरवणेही सोमवारी राजौरी येथे पोहचले आहेत. आज राजौरी आणि पुंछ येथे प्रमुख चौक्यांच्या ठिकाणी त्यांचा दौरा आहे.

दक्षिण काश्मीरमध्ये रविवारी दहशतवाद्यांनी बिहारच्या दो मजदूरांना त्यांच्या भाड्याच्या घरात घुसून गोळी मारून ठार केले. जम्मू काश्मीरमध्ये २४ तासांमध्ये झालेल्या परप्रांतीय मजुरांवर झालेला हा तिसरा हल्ला होता. त्या घटनेच्या आधी बिहारच्या एक रेहडी पटरीच्या आणि उत्तर प्रदेशच्या एका व्यक्तीवर दहशतवाद्यांनी गोळी मारून हत्या केली. या महिन्यात नागरिकांना लक्ष्य करत ११ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Cruise Drug bust : आर्यन खान प्रकरणी AIMIM च्या ओवेसींची आली प्रतिक्रिया

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -