घरमनोरंजन'या' अभिनेत्रीची नक्कल केल्याने मलाइका झाली ट्रोल

‘या’ अभिनेत्रीची नक्कल केल्याने मलाइका झाली ट्रोल

Subscribe

काही दिवसांपुर्वीच मलाइकाने तिचा हा व्हिडिओ शेअर केल्याने सोशल मीडियावर मलाइका चांगलीच ट्रोल झाल्याचे दिसत आहे.

बॉलिवूड विश्वास एकमेकांची नक्कल करणे ही काही नाविन्याची बाब नाही. आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाल्याची चर्चा सध्या होतांना दिसते, ते म्हणजे मलाइका अरोरा. नुकताच मलाइकाने आपला एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. स्पोर्टस ब्रॅण्ड शुजकरिता हा व्हिडिओ करण्यात आला होता. मलाइकाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मलाइका कॅमेऱ्यासमोर डान्स करत आपले शुज कॅमेऱ्याच्या दिशेने करताना दिसत आहे. यावेळी तिच्या शुजचा रंग बदलताना दिसत आहे. या एका व्हिडिओमध्ये असा प्रकार साधारण सहावेळा होताना दिसत आहे. या व्हिडिओने मलाइका चर्चेचा विषय ठरत आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर मलाइका झाली ट्रोल

मलाइकाचा हा व्हिडिओ अभिनेत्री जॅकलीनच्या एका व्हिडिओशी मिळता-जुळता आहे. जॅकलीनने हा व्हिडिओ जानेवारी महिन्यात शेअर केला होता. जॅकलीन केलेला हा व्हिडिओ देखील शुजच्या जाहिरातीचा होता. हा व्हिडिओ मलाइकाच्या व्हिडिओशी साम्य दर्शवणारा आहे. जानेवारी २०१९ मध्ये जॅकलीनने सोशल मीडियावर शेअर केला होता. काही दिवसांपुर्वीच मलाइकाने तिचा हा व्हिडिओ शेअर केल्याने सोशल मीडियावर मलाइका चांगलीच ट्रोल झाल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

ट्रोलर्सनी उडवली खिल्ली 

मलाइकाच्या या व्हिडिओला सोशल मीडियावरने केलेल्या चर्चेला उधान आल्याचे दिसते. ट्रोलर्सनी एकाच इंस्टाग्राम अकाऊंटवरून जॅकलीनच्या व्हिडिओ सोबत मलाइकाचा व्हिडिओ शेअर करत मलाइकाची चांगलीच खिल्ली उडवल्याचे दिसते. मलाइका आणि जॅकलीनच्या पोस्टवर प्रतिक्रीया देताना मलाइकाच्या व्हिडिओपेक्षा जॅकलीनचा अधिक चांगला होता, असे हा व्हिडिओ शेअर करताना ट्रोलर्सनी दिली.

 

View this post on Instagram

 

Here’s wishing all of you a very happy, safe and classic colorful holi. #ColorMeNylon @ReebokClassicIndia

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -