घरदेश-विदेशवजन कमी करण्यासाठी प्रवासी झाला विवस्त्र , विमानतळावर खळबळ

वजन कमी करण्यासाठी प्रवासी झाला विवस्त्र , विमानतळावर खळबळ

Subscribe

मॉस्को विमानतळावर एका प्रवाशाने आपले वजन कमी व्हावे यासाठी अंगावरचे कपडे काढले. विमानतळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

प्रवासादरम्यान स्वतःचे वजक कमी व्हावे म्हणून एक प्रवासी विमानतळावर चक्क विवस्त्र झाला असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रशियातील मास्को विमानतळावर घडली आहे. विमानतळावर विवस्त्र रांगेत उभा असल्यामुळे अनेक प्रवशांना आश्चर्याचा धक्का बसला. या माणसाला इतर प्रवाशांनी कपडे घालण्यास सांगितले मात्र त्याने याकडे कानाडोळा केला. मात्र अखेर विमानतळ अधिकाऱ्यांनी या माणसाला ताब्यात घेतले आहे. या माणसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान मॉस्को पोलिसांनी या प्रवाशावर कारवाई केली आहे. शरीरावरील कपड्यांमुळे त्याला त्रास होत असल्याचे तो ओरडला मात्र त्याला अटक करण्यात आली.

- Advertisement -

यापूर्वीही घडल्या विचित्र घटना

यापूर्वी ही युएईच्या विमानातून प्रवास करणाऱ्या माहिला प्रवाशी आपल्या लहान मुलाला वेटिंग रुमध्ये विसरुन गेली होती. नवीन जन्म झालेल्या बाळाला ही महिला वेटिंग रुममध्ये दुध पाजत होती. दुध पाजून झाल्यानंतर या महिलेने बाळाला बाजूला ठेवले आणि विसरून गेली होती. विमानात बसल्यावर या महिलेला आपल्या बाळाची आठवण झाली. यानंतर या महिलेने विमान थांबवून बाळाला आपल्या ताब्यात घेतले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -