घरमनोरंजनमलायकाने सांगितलं चाहत्यांना खोटं! व्हिडीओमुळे होतेय ट्रोल

मलायकाने सांगितलं चाहत्यांना खोटं! व्हिडीओमुळे होतेय ट्रोल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सतत सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत असते. सध्या मलायका डान्स रियालिटी शो ‘झलक दिखला जा सीजन 11’ मध्ये जज म्हणून दिसून येते. मलायकाव्यतिरिक्त अभिनेता अरशद वारसी आणि फराह खान देखील हा शो जज करत आहेत. अनेकदा शोच्या सेटवर या तिघांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये हे घरुन आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेताना दिसतात. दरम्यान, आता पुन्हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यावरुन मलायकाला ट्रोल केलं जात आहे.

जेवणाच्या व्हिडीओवरुन मलायका ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)

‘झलक दिखला जा सीजन 11’ च्या सेटवर फराह खान नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच फराहने लंच डाईममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात मलायका घरुन आणलेले पदार्थ दाखवत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला मलायका सांगते की, माझ्या आईच्या घरून ही फिश करी आली आहे. शिवाय दुसऱ्या व्हिडीओमध्ये फराह मलायकासाठी घरुन आणलेली बिर्याणी वाढताना दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)

- Advertisement -

परंतु मलायका चाहत्यांना ती शाकाहारी असल्याचं सांगते. मग आता ती मासांहार करत असल्याचं दिसत असल्याने अनेकजण तिला ट्रोल करत आहेत. हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. युझर्स मलायकाला खूप ट्रोल करताना दिसत आहेत. एका युझरने लिहिलंय की, “मलायका तर एका मुलाखतीमध्ये ती शाकाहारी आहे असं म्हणाली होती, पण आता ही बिर्याणी खातेय”, तर दुसऱ्याने युझरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “मलायका खूप खोटं बोलते ती नाटकी आहे” अशाप्रकारे अनेकजण मलायकाला ट्रोल करताना दिसत आहेत.


हेही वाचा : प्रियंकाचा लेकीसोबत स्पेशल टाइम; क्युट फोटोवर चाहत्यांची कमेंट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -